कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील मोठी बाजारपेठचे ग्रामीण शहर कुंभार पिंपळगाव येथील पोस्ट ऑङ्गिस कार्यालयात कामकाज सुरळीत होत नसल्याने येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन देऊन कार्यालयाचे कामकाज 24 जुलै पूर्वी पुरवत करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे कार्यालयात कर्मचारी उपस्थित न राहणे इंटरनेटची जोडणी नसल्याचे कारण सांगून कामकाज बंद आहे कार्यालयात स्पीड पोस्ट, रजिस्टरी, नवीन खाते उघडणे, पैसे भरणा घेणे टपाल सुविधा, सुकन्या योजनेचे काम मागील दहा ते बारा महिन्यापासून बंद आहेत कार्यालयात 1 एक दोन 2 कर्मचारी असतात इंटरनेट बंद सांगतात कोणतेही कामकाज करत नसल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
निवेदनावर अन्सिराम कंटुले जि.प.सदस्य, संदीप कंटुले, शिवाजी कंटुले पांडुरंग काशिनाथ कंटुले, अतुल कंटुले, गंगाधर लोंढे, दिलीप कंटुले संभाजी राऊत, उध्दव राऊत, शेख मतीन, माजेद पठाण, पवन नाईकनवरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत मी माझ्या कार्यालयीन कामाच्या ठिकाणी वास्तव्यास आहे. जेवढे टपाल येतात ते नियमित वाटप केले जातात पोस्टमन अरुण जाधव कुं.पिपंळगाव जालना जिल्ह्यात कुंभार पिंपळगाव पोस्ट ऑङ्गिस कार्यालयाचे कामकाज पहिल्या पाच यादीमध्ये आहे सर्व कामकाज चालू आहे ङ्गक्त या ऑङ्गिसला इंटरनेट जोडणी नाही. तरी ही घनसावंगी येथे जाऊन इंटरनेटची कामे केली जातात व कुंभार पिंपळगाव इंटरनेट खंडीत सेवेबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे किशोर ससे पोस्ट मास्तर पोस्ट ऑङ्गिस कार्यालय कुंभार पिंपळगाव.
Leave a comment