जाफराबाद । वार्ताहर
महाराष्ट्राबरोबरच जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे.या कोरोना महामारीच्या काळात आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका महत्वाची भूमिका बजावत आहे,परंतु अपुर्या सुरक्षा साधनांच्या अभावी आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालून ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळले आहे. शा प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षणाचे काम करणे तसेच बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींना क्वारन्टाईन करणे, हीच बाब लक्षात घेत जाफ्राबाद भोकरदन विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाफ्राबाद तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांना व अंगणवाडी सेविकांना मास्क आणि सॅनीटाईझरचे वाटप केले.जाफ्राबाद तालुक्यात 159 आशा स्वयंसेविका व 190 अंगणवाडी सेविकांना या कीटचे वाटप आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
मार्गदर्शन करतांना आ.दानवे म्हणाले की आपण सर्व या कोरोना सारख्या महामारीच्या काळात अतिशय कठीण आणि अवघड असे काम करत आहात.आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.या संकटाच्या काळात आपल्याला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी म्हणून खंबीर पणे आपल्या पाठीशी उभे राहू.या महामारीला घाबरून न जाता अतिशय हिंमतीने सामना करून कोरोना वर विजय मिळवायचा आहे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या सुरवातीलाच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती सभागृहात उपस्थित सर्व मान्यवराच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी सुरेश दिवटे सर,संतोष पा.लोखंडे,गोविंदराव पा.पंडित,राजेश पा.चव्हाण,दत्तू पा.पंडीत,दगडूबा गोरे,तालुका गट विकास अधिकारी विलास गंगावणे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोनटक्के साहेब,जगन पंडीत,साहेबराव कानडजे,अश्रुबा बोर्डे,विजय परिहार,साहेबराव मोरे, मनोज शिंदे,अवचीतराव भोपळे,कैलास मोरे,विठ्ठल भालके,गजानन शेवत्रे,कौसर शेख,रविराज जैस्वाल,अनिल बोर्डे,राजेश म्हस्के,कदीर टेलर,रमेश गाडेकर,भक्ता चव्हाण,अनिल नवले,कृष्णा सिरसाट,राजू जगताप,श्याम वैद्य,अनिल वरगणे,विजय शेवत्रे,विनोद पंडीत,संजय साबळे,दत्ता कर्हाळे इत्यादींची उपस्थिती होती.
Leave a comment