जालना । वार्ताहर
छत्रपती शाहु महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले आहे. यामुळे या समाजाची शक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवता आल्यामुळेच मागावर्गीय आणि इतर मागावर्गीय समाज हा आज प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना दिसत आहे. ही किमया केवळ शाहु महाराज यांच्या दुरद्ष्टी पणामुळेच घडवुन आली आहे. असे प्रतीपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा (संभाजी उद्यान समोर) येथे शुक्रवार रोजी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी आ. कैलास गोरंट्याल यांनी छत्रपती शाहु महराज यांच्या प्रतिमेस आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. आ.कैलास गोरंट्याल यांनी पुतळच्या ठिकाणी फोल्डिंग सीडी आपल्या स्वत ःच्या खर्चातुन बनवुन दिली. यावेळी या सीडीचे आ. कैलास गोरंट्याल यांनी उद्घाटन करुन शुक्रवार रोजी लोकअर्पण केले. याप्रसंगी मराठा महासंघाचे जिह्यध्यक्ष अरविदं देशमुख, अशोक पडुळ, शहर कॉग्रेचे अध्यक्ष शेख मेहमुद, राम सांवत, शिवसेना गट नेते विजय पवार, नगरसेवक महेश निकम, विनोद रत्नपारखे, राजस्वामी, अभियता सऊद, गजुभाऊ तौऊर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. कैलास गोरंट्याल यांचे मराठा महासंघाच्या वतीने पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठा महासंघाचे जिल्हध्यक्ष अनविदं देशमुख, अशोक पडुळ, यांनी करुन यावेळी बोलताना सांगीले की आ.कैलास गोरंट्याल हे जे बोलता ते मात्र नक्की करतात अशी त्यांची समाजामध्ये ओळख आहे. श्री. गोरंट्याट यांनी छत्रपती शिवाजी महराज पुतळा येथे हायड्रॉलिक सीडी बसविण्यासाठी जालना नगर परीषेदेच्या माधमातुन लवकरच प्रक्रीया पुर्ण करण्यात येणार असल्याची आश्वासन त्यांनी दिले असल्याचे यापुर्वीच सांगीतले असल्याचा उलेख यावेळी करण्यात आला. याप्रसंगी योगेश मोरे, संतोष कर्हाळे, राहुल पवार, प्रदिप गिरी, श्याम सिरसाठ, अमोल सुळसुळे, इजि मचेवार, इजि मिरुगु, आशिष चव्हाण, किरण शिरसाठ, अनिरुध्द जाधव, शंकर घोडके, दादासाहेब जिगे, आकाश ढेगळे, मिलिंद गंगाधरे, महेश नागवे, गणेश खेडेकर, गणेश ढवळे, गोपाल गिरी, अभय देशमुख, किरण देशमुख, निरज बिडकर, प्रदिप जाधव, अनिरुध्द झाल्टे स्वाप्निल मोताळे, अभिषेक जाधव आदी कार्यर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तथा संयोजक करण जाधव यांनी केले.
Leave a comment