दहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक

जालना । वार्ताहर

जालना शहरातील गुडला गल्ली 03, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 03 जवान, भाग्यनगर परिसरातील 02,बालाजी नगर परिसरातील 01, भराडखेडा ता. बदनापूर येथील 01 अशा एकुण 10 रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात तर जालना जिल्हा क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेले 02 कर्मचारी, जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरात असलेल्या निवास स्थानातील 01 रुग्ण, जालना शहरातील हनुमान नगर परिसरातील 01,सदर बाजार परिसरातील 01,कालीकुर्ती परिसरातील 01,वैभव कॉलनी परिसरातील 01, जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील01, जाफ्राबाद तालुक्यातील भारज येथील 01 अशा एकूण 09 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. जालना शहरातील सदर बाजार परिसरातील रहिवासी असलेली 55 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा ञास होत असल्यामुळे दिनांक 23 जुन, 2020रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 24 जुन, 2020 रोजी  त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याच दिवशी लगेचच त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी औरंगाबाद पाठवला होता. त्याचा अहवाल दिनांक 25जुन, 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-3837 असुन  सध्या रुग्णालयात -111,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1466, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-68, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4742, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने-09 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-407, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4263 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-406 एकुण प्रलंबित नमुने-68, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1342. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-02, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती -1217, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-26, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-265, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-29, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -111, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-02, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-287, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -98, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-09, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10741, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे. 

आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 265 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-27,संत रामदास वसतिगृह जालना-22,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-60,मॉडेल स्कूल परतुर-05, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-01,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-04, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-25, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-09,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद 00, जे. बी. के. विद्यालय टेंभुर्णी 28,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 30. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 877 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  3 लाख 97 हजार 630 असा एकुण 4 लाख 24 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.