मंठा । वार्ताहर
कोरोनाव्हायरसमुळे लॉक डाउन काळात कापूस खरेदीची गती मंदावल्याने तालुक्यात अनेक शेतकर्यांचा कापूस शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाल्याने कापूस भिजण्याची भीती असते. जून महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे कापसाचे नुकसान झालेले आहे. या सर्व बाबी च्य पार्श्वभूमीवर मंठा बाजार समितीच्या वतीने शेतकर्यांच्या कापूस खरेदीस विलंब होऊ नये, त्यांचा कापूस भिजणार नाही यासाठी भारतीय कपास निगम मार्ङ्गत होत असलेल्या कापूस खरेदी साठी पत्राचे शेड उभारण्यात आले आहे.
सभापती संदीप गोरे, उपसभापती राजेश मोरे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जालना सहाय्यक निबंधक एस.बी.भालेराव, मंठा सहाय्यक निबंधक कार्यालयाचे श्री किंबहुने, ग्रेडर श्री ठाकरे, जिनिंग मालक संजय छल्लाणी बाजार समितीचे कर्मचार्यासह पाहणी केली. मंठा बाजार समिती कार्यक्षेत्रातील एकाही शेतकर्यांचा कापूस शिल्लक राहणार नाही, शेवटच्या शेतकर्यापर्यंत कापूस खरेदीसाठी संपर्क करून कापूस खरेदी केला जाईल. असा विश्वास शेतकर्यांना सभापती व उपसभापती यांनी दिला.
Leave a comment