कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजून जात आहे शेतकरी चिंताग्रस्त दुबार पेरणीचे संकट उभे राहते की काय अशी भिती आता शेतकर्यांना. वाटत आहे. एकी कडे कोरोनाच्या संकटाने सगळी जनता हैराण झाली आहे. कोरानामुळे सगळी जगण्याची व्यावस्था कोलमोडली आहे तालुक्यासह कुंभार पिंपळगाव सह परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके कोमजुन जात आहेत मागील आठवडी बाजाराच्या दिवशी बुधवार रोजी चांगला पाऊस झाला होता आज बुधवार तारीख 24 आठवडी बाजारच्या दिवशी कडक ऊन पडले असून असाह्य गर्मी होत आहे गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उग ऊन वर आलेली सोयाबिन,कापुस, मुग आदि पिके सुकून गेली आहे. यावर्षी पाऊस चांगला राहील असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. मिरूग नक्षत्रात पेरणी झाली. परंतु मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही शेतकर्यांना आहे.
पेरणीयोग्य पाऊस झाला पेरणी झाली जमिनीत ओल कमी होती. सर्व शाम पाऊस झालाच नाही अनेक भागात पेरण्या बाकी आहे तर गोदाकाठच्या काही भागात पाऊस जास्त झाल्याने वापसा न झाल्यामुळे पेरण्या बाकी आहेत दरवर्षी त्या प्रमाणात या वर्षी कापूस लागवड कमी झाली असल्याचे येथील कृषी केंद्राचे सुरेश नाईक यांनी सांगितले मागील वर्षी आमच्या कृषी सेवा केंद्रातून जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 4500 चार हजार कापसाच्या बियाण्यांची पाकिटे विक्री झाली होती या वर्षी मात्र ङ्गक्त आतापर्यंत दीड हजार 1500 कापसाच्या बियाण्यांची पाकिटे विक्री झाली आहे यावर्षी सोयाबीनची पेरणी जास्त प्रमाणात झाली असून सोयाबीन च्या बियाण्याला मागणी आहे शेतकर्यांनी खाजगी तर काही शेतकर्यांनी सर्टिङ्गाइड सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी मागणी केले आहे .अनेक शेतकर्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवण शक्ती झाले नसल्याने बोगस बियाणे मिळाल्या असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत त्यात पावसाने दडी मारल्याने आता शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शेतकर्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे.
Leave a comment