मंठा । वार्ताहर
सर्वांना आपले जीवन निरोगी व कार्यक्षम ठेवण्यासाठी प्रेरणा मिळावी.योगाच्या माध्यमातून आपण निरोगी जीवन जगू शकतो.त्यामुळे नियमित योग करणे अनिवार्य असल्याचा हितोपदेश महंत बालकगिरीजी महाराज यांनी योगीदिनी दिला.तालुक्यातील देवगाव ख. येथील संस्कार प्रबोधिनी गुरूकुलच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण व योगाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना भविष्यसाठी योगाचे धडे देण्याचे काम महंत बालकगिरी महाराज यांच्याकडून देण्यात येत आहे.
योगदिनी पुढे बोलतांना महंत बालकगिरी महाराज म्हणाले की, श्रीमद् भगवद्गीतेमध्ये ‘योगः कर्मसु कौशलम्, पतंजलीनी योगः चित्तवृत्ती निरोधः’ अशी योगाची व्याख्या केली आहे. या योगशास्त्राच्या व्याख्या असे सांगतात, की आपल्या कामातील कार्यातील कौशल्य, कुशलता म्हणजे योग. चित्तवृत्तींवर शाश्वत जीवनाच्या मार्गावर योग आपणाला घेऊन जातो. जीवनाची बाल्यावस्था, प्रौढ किंवा वृद्धावस्था या तीनही स्तरावर योग आपणाला अतिशय उपयुक्त ठरतो, हे प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.निरोगी आणि आनंद जगण्याची गुरुकिल्ली योग आपल्याला देतो. त्यामुळेच आनंदी जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग असे म्हटले जाते.असे शेवटी बोलतांना सांगितले.
Leave a comment