शहरातील कोरोना बाधितांची संख्या पाच तर ग्रामीणचा एक
भोकरदन । वार्ताहर
भोकरदन शहरात कोरोना बाधितांची संख्या कासावगतीने का होईना पण वाढतच चालली आहे. शहरातील नवे भोकरदन भागातील नूतन कॉलनी तील एक 60 वर्षीय युवक जालना येथे शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी सकाळी 23 रोजी मरण पावला. दरम्यान, कोरोनामुळे बळींची संख्या दोन झाली आहे.तर कोरोना बाधितांची शहराची पाच तर ग्रामीण भागातील एक असे तालुक्याची संख्या सहा झाली आहे.
भोकरदन शहरात सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाला नाही. जिल्ह्यासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भोकरदन शहर माञ कोरोना पासून दूर होते. परंतु मागील दहा बारा दिवसात हळूहळू का होईना रुग्ण सापडत असल्याने शहर वासियासह प्रशासन ही खडबडून जागे झाले आहे. इतर कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत असून ते रुग्ण लवकरच निगेटिव्ह येतील अशी अपेक्षा असतानाच आज अचानक नूतन कॉलनी भागातील एक रुग्ण जालना येथे उपचारासाठी काल गेला असता ते कोरोना बाधित निघाले परंतु ते उपचारादरम्यान आज सकाळी मरण ही पावले. सदर घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच तहसीलदार संतोष गोरड, नगर परिषद चे मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिकुलाल वडदे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीपवळे, नगर परिषद चे वामन आडे, कैलास जाधव, परशराम ढोके यांनी तात्काळ नूतन कॉलनी परिसरात धाव घेऊन तो परिसर सील केला. तर त्यांच्या कुटुंबासह संपर्कातील जवळपास आठ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती नगर परिषदचे मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांनी दिली.
Leave a comment