जालना । वार्ताहर
पोलीस म्हटलं की अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात, कारण शासनाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी खर्या अर्थाने पोलिसावर असल्याने पोलिसांकडे समाज अनेक अपेक्षापूर्तीने बघत असतो.शासनाने वेगवेगळे प्रश्न हाताळण्या करिता वेगवेगळे विभाग तयार केलेले असले तरीही प्रत्येक विभागाला त्यांची जबाबदारी पार पाडताना पोलिसांची मदत अपेक्षितच असते, काम, कुठलेही असो पोलीस आलाच मग कोरोना महा मारीत तर पोलिसाला, स्वतःला ला आपला जीव धोक्यात घालून उभे राहणे अपेक्षित आहेच म्हणून समाजाच्या अपेक्षापूर्ती काही पोलीस आगळेवेगळे कर्तव्य करत असताना समाज पहात असतो
असेच पोलिस स्टेशन सदर बाजार जालना कात्राबाद चौकीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार हे मागील दोन महिन्यापासून अहोरात्र समाजसेवेला आद्यकर्तव्य समजून समाज हे कुटुंब आहे असे मनापासून मानून कोरोनाशी लढतांना रोडवर उभे आहे, त्यांनी मागील दोन महिन्यात जालना शहरातील विविध भागातून आलेल्या कोविड -19 रुग्णांना शोधून त्यांचे समुपदेशन करून त्यांना सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवून कोरोना ची साखळी तोडणे करिता स्वतः आपल्या जीवाची मानवी साखळी तयार करून समाजसेवेचे मोठे कार्य केलेले आहे त्यांच्या कार्याची दखल म्हणून पोलीस जाणीव सेवा संघ संघटनेचे किशोर नाटकर अमित आर्य व आकाश ठोंबरे यांनी त्यांच्या हस्ते श्री परशुराम पवार यांना कोविड 19 योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.*
Leave a comment