डॉ.वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

जालना । वार्ताहर

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त डॉ वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालयातर्ङ्गे धरती जनसेवा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांसाठी ‘माय योगा ङ्ग्रेम’ इव्हेंट चे आयोजन करण्यात आले होते. आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीशी लढत आहे या महामारीचा सामना करतांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. 

कोरोनाच्या संक्रमनापासून दूर राहण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव आज प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या घरीच आहे. माय योगा ङ्ग्रेम इव्हेंट मध्ये विद्यार्थ्यांनी घराबाहेर न पडता आपल्या घरीच योगासने सादर करून त्याचा एक ङ्गोटो घेऊन त्या ङ्गोटोसोबत 2 ओळीचा मेसेज लिहून विशिष्ट इ मेल आयडी वर पाठवायचा होता. या उपक्रमाबद्दल माहिती सांगताना डॉ वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ अस्मिता शिंदे म्हनाल्या, माय योगा ङ्ग्रेम या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्द्ल जागृती होऊन रोज योगा करण्यास विद्यार्थ्यांनी प्रवृत्त व्हावे असा आहे. या उपक्रमामध्ये डिजेपी शैक्षणिक संकुलातील डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय, ओजस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, डीजेपी पॉलिटेक्निक, डिजेपी अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या उपक्रमामध्ये शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांबरोबर प्राध्यापकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भागवत शिंदे, प्राचार्या डॉ.वृषाली साळी, प्राचार्य डॉ.विठ्ठल कुचके, प्रा. विजय जर्‍हाड, डॉ. अस्मिता शिंदे, प्राचार्य जितेंद्र इंगळे, प्रा.पुरुषोत्तम राखुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.