जालना । वार्ताहर
जिल्हा प्रशासनाकडून गठीत करण्यात आलेले एकूण 8 पथकाकडून शहरामध्ये सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक अंतर न राखणारे नागरिक, तोंडाला मास्क न लावणारे नागरिक व इतर बाबींसाठी नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली असून पथकांमार्ङ्गत सामाजिक अंतर न राखणारे 72 व्यक्तींकडून एकुण 14 हजार 400, तोंडाला मास्क न लावणार्या 15 नागरिकांकडून 7 हजार 500 रुपये आणि सामाजिक अंतर न राखणार्या एका दुकानदाराकडून 200 रुपये असे एकूण 23 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे, उपपोलीस अधिक्षक जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे तसेच नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रतिबंध क्षेत्रांमध्ये हातगाडीवर भाजीपाला व ङ्गळे विक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
Leave a comment