कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
अशोक कंटुले घनसावंगी तालुक्यातील नव्यानेच पदभार स्वीकारलेले तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी ता. 22 सोमवार रोजी वृक्षरोपणा बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्ग संवर्धन निसर्गप्रेमी व समाजभान टीमचे दादासाहेब थेटे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आपले यावेळी मत व्यक्त केले या बैठकीस नारायणभाऊ देवकाते ,शिवाजीराव बजाज ,हातडीचे सरपंच शिंदे , संदिपान सातपुते ,डॉ.गंगाधर धांडगे, महादेव मते , जगताप पत्रकार गणेश ओझा ,अविनाश घोगरे ,अशोक कंटुले यांची यावेळी उपस्थिती होती या बैठकीदरम्यान समाजभान टिमच्या वतीने अंबड तालुक्यात केलेल्या 65 शाळेच्या वृक्ष रोपनाची चर्चा करण्यात आली व वृक्ष रोपणासाठी पर्यावरण रक्षक -चषक स्पर्धाही घेण्यात आल्या अनेक कुटुंबाकडे समाजभानणे एका झाडाची जिम्मेदारी मुलगी म्हणून दिली त्या वृक्षांचे संगोपन झाले पाहिजे असे सांगून त्यांनी प्रत्येक झाडाचा वाढदिवसही साजरा केला जातो असे थेटे यांनी या बैठकीदरम्यान सांगितले समाजभान टिमचे सामाजिक मोठे काम असून सध्या दररोज वृक्षारोपण करण्याकरिता दोन तास श्रम कार्य करत आहे .झाडे उपलब्ध करण्यापासून प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करावा लागत आहे सध्या दररोज 25 झाडे लावून पर्यावरण रक्षणासाठी श्रम कार्य करत आहोत.
तहसीलदार देशमुख यांनी समाजभान टिम सारख्या अशा तालुक्यामध्ये अनेक टिम निर्मान व्हाव्यात व एकत्र येऊन वृक्षारोपना सारखे सामाजिक कामे करण्याची गरज आहे .त्यांनी यावेळी समाजभान टीमचे कौतुक केले पुढे देशमुख म्हणाले की पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक वर्षी वृक्षारोपण झाले पाहिजे गावागावातील शाळा-कॉलेज बाजारपेठा स्मशानभुमी सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे. आपल्या गावाच्या सौंदर्यात वृक्षरोपणाने आधिक भर पडेल गावात वृक्ष रोपणाचे पालकत्व जे स्वीकारतील त्या गावच्या ग्रामपंचायतीला लवकरच वृक्षाची रोपे दिले जातील व दहा गावांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात येईल .या वर्ष वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात येणार असून ते म्हणाले स्वयंस्फूर्तीने ज्या गावातील युवक व ग्रामपंचायत वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील त्यांच्यावर वृक्षरोपनाची जिम्मेदारी देण्यात येणार असून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे हे गावाच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य समजून प्रत्येक माणसाच्या मनात एक झाड लावण्याचा विचार रुजला पाहिजे. तर आपोआप अनेक झाडे रुजतील प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावण्याचा प्रयत्न करावा झाडे जगली तरच आपण जगू अशा या समाजभान टीमच्या वतीने चर्चासत्र कार्यक्रमात वृक्षरोपणाचे आयोजन करण्यात आले.
Leave a comment