बदनापूर । वार्ताहर
बदनापूर तालुक्यातील काजळा या गावात एक इसम हातभट्टी दारूची विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी नियुक्त केलेल्या विशेष पोलीस पथकास मिळाल्याने या पथकाने काजळा गाव गाठून विक्री करणार्या इसमाचा शोध घेतला असता हातभट्टी दारू व दारू बनविण्यासाठी आवश्यक असलेले रसायन मिळून आले असता पोलिसांनी 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला
लॉक डाऊन च्या काळात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी विशेष पोलीस पथक स्थापन केला असून या पथकास 22 जून रोजी बदनापूर तालुक्यातील काजळा येथील गोरख भीमराव जाधव वय 50 वर्ष हा गावठी हातभट्टी दारू बनवून विक्री करीत असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली असता पोलीस अधीक्षक एस.चैतन्य,अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार,पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर,यांच्या मार्गदर्शनखाली अवैध दारू विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक संपत पवार,सुरेश राठोड,रामेश्वर बघाटे,राम पव्हरे,राजेंद्र वेलदोडे,यशवंत मुंढे,किशोर जाधव,परमेश्वर धुमाळ,अलका केंद्रे,रत्नमाला येडके,धोंडीराम मोरे यांनी काजळा गाठून सदर इसमाच्या घराची पाहणी केली असता घराच्या समोर कुंडामध्ये गावठी दारू व द्रॅम मध्ये दारू बनविण्यासाठी लागणारे रासायनिक साहित्य मिळून आले असता पोलिसांनी एकूण 36 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Leave a comment