डिवायएसपीपदी निवड : मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
जालना । वार्ताहर
वारकरी संप्रदायातील किर्तनकार डॉ. सुदाम महाराज चेपटे पानेगावकर यांचे चिरंजीव शामसुंदर चेपटे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 चे परिक्षेत डिवायएसपी पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागात राहून हि हे यश मिळविले या बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
डॉ.सुदाम महाराज चेपटे हे मुळचे अंबड तालुक्यातील पानेगाव येथे राहणारे पण वैद्यकीय व्यवसाय निमित्ताने ते जालना जिल्ह्यातील सेवली येथे स्थायिक झाले. शामसुंदर यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण लोकमान्य टिळक महाविद्यालय सेवली येथे तर औरंगाबाद येथे देवगिरी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माईसॅ एमआयटी पुणे येथे कॉम्पुटर इंजिनिअर झाले. 2018 मध्ये त्यांना लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत अवघ्या दोन गुणांनी त्यांची हि संधी हुकली आणि सहायक कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात नेमणूक झाली. परंतू वारकरी संप्रदायाचे संस्कार, डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व अविरत प्रयत्नामुळे अवघ्या वर्षभरात त्यांनी हे यश मिळविले. डॉ. सुदाम महाराज चेपटे यांनी आध्यात्म, ज्ञान, विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांची दोन मुले आणि मुलगी पदवीधर झाली. समाज प्रबोधनकरत त्यांनी सेवली सारख्या ग्रामीण भागात ज्ञानाई दालमिल हा उद्योग ऊभा करून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील वंचित उपेक्षित बहूजनांच्या आरक्षण लढ्याला हे मोठे यश मिळाले आहे. किर्तन, वैद्यकीय व्यवसाय, दालमील उद्योग आणि पदव्युत्तर शिक्षण हे सर्व परस्पर विरोधी क्षेत्र असले तरी जिद्द चिकाटी मेहनत चांगले संस्कार आणि थोरामोठ्यांच्या संगतीने जिवनाच्या सर्व क्षेत्रात नेहमी यशस्वी होणं हे अवघड गणित जुळवून आणण्याचे काम चेपटे महाराज यांनी कौशल्याने पुर्णत्वास आणले आहे. येणारा काळ कसोटीचा आहे. अनेक मुलं - मुली खूप मेहनत घेऊन यशस्वी होत आहेत. संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही मात्र गुणवान विद्यार्थ्यांना मार्ग सापडतो.समाज सेवेची संधी मिळाली आहे प्रामाणिकपणे काम करत जनता जनार्दनाच्या सेवेचे हे व्रत पुर्ण करु, असा विश्वास श्री. चेपटे महाराजांनी व्यक्त केला. या यशाबद्दल श्री. चेपटे यांचे एमआयटीचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड, राहुल कराड, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, खा. भागवत कराड, आ. बबनराव लोणीकर, मा. आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवाजीराव चौथे, भगवान सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र राख, वंजारी सेवा संघाचे राहुल जाधवर, देवेंद्र बारगजे, जगत घुगे ,डॉ. श्रीमंत मिसाळ, माजी आमदार संतोष सांबरे, डॉक्टर प्रमोद डोईफोडे, दीपक दराडे, प्रकाश जायभाये, जगदीश नागरे, वाल्मीकराव घुगे, मधुकर सोनवणे, रावसाहेब वाघ, रमेश महाराज वाघ, अनिरुद्ध खोतकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, सत्संग मुंडे, रमेश पाटील गव्हाड, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment