तीन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
तोंडाला मास्क न लावणार्या 9 नागरिकांकडून दंड
जालना । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयातून जालना शहरातील उडपी हॉटेल जवळील - 1, राज्य राखीव पोलीस दलातील 2 जवान अशा एकुण तीन रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील - 2, हकीम मोहल्ला -1, नाथ बाबा गल्ली - 1, वाल्मीक नगर - 2 राज्य राखीव दलातील -1 जवान, अंबड शहरातील चांगले नगर येथील - 1, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील- 9 अशा एकुण सतरा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-3657 असुन सध्या रुग्णालयात -98, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1400, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-29, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4490, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-17 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -378, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4077 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-404 एकुण प्रलंबित नमुने-31, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1291. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-16, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती -1199, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -11, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-297, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-6, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-98, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-12, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 3, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-248, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-113, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-06, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10326, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 11 एवढी आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 297 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-84, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-10, संत रामदास वसतिगृह जालना-06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-16, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-31, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-56 मॉडेल स्कुल परतुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-03, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-12, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-14, मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -12, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-03, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद -9, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -33. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 170 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 854 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 45 हजार 230 असा एकुण 3 लाख 72 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तोंडाला मास्क न लावणार्या 9 नागरिकांकडून 4 हजार 500 रुपये...
जिल्हा प्रशासनाकडून गठीत करण्यात आलेले एकूण 8 पथकाकडून शहरामध्ये सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक अंतर न राखणारे नागरिक, तोंडाला मास्क न लावणारे नागरिक व इतर बाबींसाठी 58 नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली असून पथकांमार्फत 58 व्यक्तींकडून एकूण 11 हजार 600 रुपये व तोंडाला मास्क न लावणा-या 9 नागरिकांकडून 4 हजार 500 रुपये असे एकूण 16 हजार 100 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे, उपपोलीस अधिक्षक जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. तसेच नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रतिबंध क्षेत्रांमध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
Leave a comment