गाव फौजींचे अशी गावची ओळख
जाफराबाद । वार्ताहर
अनेक गावे अशी आहे की त्यांना कुठलीच ओळखची गरज नाही, कारण त्यांच्या विशिष्ट कार्याने ते गाव जिल्ह्याभरच नव्हे तर राज्यात ओळखले जाते, अशेच एक गाव आहे जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी पासून तीन कि मि अंतरावर असलेले ’अकोला देव.’ अकोला देव गावने आपली ओळख स्वतः तयार केली आहे, ह्या गावाला जिल्ह्यात फौजींचा गांव म्हणून ओळखले जाते. फक्त तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावांने आतापर्यंत देशसेवेत 60पेक्षा जास्त जवान दिले आहे. एकीकळे देशात कोरोना महामारी हाहाकार माजविला आहे, तर दूसरीकळे भारत चीनमध्ये सिमेवर चकमक सुरु आहे, अशा परिस्थितित एका लहानश्या गांवचे एक दोन नव्हे तर तब्बल 60 शिपाई देशसेवा करीत आहे ही अकोला देव व संपूर्ण जाफराबाद तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
दशरथ जाधव हे गावातील पहिले फौजी जे 1968 मध्ये सेनेत भर्ती झाले. ह्यांचाच आदर्श घेत गावातील तरुण सेनेत भर्ती होत गेले, व आजपर्यंत60 पेक्षा जास्त जवान फौजमध्ये भर्ती होऊन देशसेवा करीत आहे. व पुढेही देशसेवेचा वारसा जपणार अशे येथील तरुण सांगत आहे. या गाँवचे आतापर्यंत आठ फौजी रिटायर झाले असून ते गावात आपल्या देशसेवतील किस्से तरुणाना सांगून त्यांना सैनिक होण्यास प्रेरणा देत आहे. आपण फौजमध्ये कसे गेलात अशी विचारना केली असता काहिंनी म्हटले की भारत-पाक युद्धात भारतीय सैनिकांचे पराक्रम ऐकून सेनेत भर्ती होण्याचे ठरविले, तर काहिंनी म्हटले की देशभक्तिवर असलेले सिनेमा पाहून मनात देशसेवेची ईच्छा झाली. अशा या लहानश्या अकोला देव फ़ौजीचे गाँव चे जितके आदर्श घ्यावे तितके कमीच, येथील सैनिकांचे आदर्श घेऊन हज़ारो तरुण देशसेवेत जातील हे मात्र खरे.
Leave a comment