जालना । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न पाळणार्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक अंतर न राखणार्या 33 व्यक्तींकडून 19 हजार 800 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्या 22 व्यक्तींकडून 11 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळविक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणार्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहनही मुख्याधिकार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Leave a comment