बदनापूर । वार्ताहर
बदनापूर तालुका हा औरंगाबादसारख्या रेड झोनच्या शेजारी असतानाही प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तालुक्यात सुरुवातीचे अडीच महिने कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यानंतर बदनापूर शहरातील चार जण पॉझिटिव्ह निघाले होते ते तंदुरुस्त होऊन आले असतानाच तालुक्यातील भराडखेडा येथील चार जण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे तालुक्याची चिंता वाढलेली असतानाच या गावातील या पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेले 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.
बदनापूर तालुक्यातील आरोग्य प्रशासन, पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासूनच कोरोना रोगाबाबत सतर्कता पाळल्यामुळे औरंगाबादसारख्या रेड झोनच्या शेजारी असूनही बदनापूरात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नव्हता. दरम्यान शहरातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत त्याचा फैलाव रोखला तसेच हे चारही जण तंदुरुस्त होऊन घरी वापस आलेले असतानाच तालुक्यात भराडखेडा येथील चार जणांना कोरोनाची लागन झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. त्यातील एका रुग्णावर जालना येथे कोविंड रूग्णालयात उपचार सुरू आहे व तीन रुग्णावर औरंगाबाद येथे एमआयटी केअर सेंटर येथे उपचार सुरू असून हे चारही रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत आहे येत्या दोन-तीन दिवसात त्यांनाही रुग्णालयातून घरी पाठविले जाणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तसेच या रुग्णाच्या संपर्कात असलेले 14 जणांना प्रशासनाने तात्काळ बदनापूर येथील अलगीकरण कक्षात कोरांटाईन करून त्यांच्या लाळेचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून हे चौदाही जण निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे भराडखेडयातही या रोगाची लागण रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या बाबत या गावाचे रहिवाशी व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनीही गावात मोठया प्रमाणात कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले होते. त्यांनी गावासह तालुक्यात सॅनिटायझर वाटप तसेच गावात औषधी फवारणी केलेली होती. त्या प्रयत्नांनाही यश आले असून भराडखेडयात सद्यस्थितीत तरी कोरोनाचा शिरकाव थांबवण्यात यश मिळाले आहे.
Leave a comment