मंठा । वार्ताहर
तालुक्यात 21 कोरोना बाधित व्यक्ती नी कोरोना वर मात केली आहे व सर्व जण कोरोना मुक्त झाले आहेत मंठा आतापर्यंत 211 जणाचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते त्या मध्ये 21 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते यामध्ये पेवा गावातील 2,हानवतखेडा वैद्य वडगाव व कानडी प्रत्येक एक .आकणी 2 .केधळी 3.नानशी पु.11 जणाचा समावेश होता या सर्व गावात सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले व आज रोजी आकणी व नानशी येथील 14 दिवसाचा सर्वेक्षणची समाप्ती झाले आहे.
दोन्ही गावात एकुण 407 घरातील 2025 लोकाची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे त्या मध्ये कोणाला कुठलेही लक्षणे आढळून आले नाही त्या बरोबर दोन्ही गावात बीपी .शुगर व गरोदर स्त्रिया ची ही प्राथमिक तपासणी करण्यात आली त्या मध्ये कोणालाही लक्षणे दिसून आले नाही .तसेच आकणी गावाचे वतीने कोरोना सर्वेक्षण करणारे टिम सदस्य चा सत्कार केला कोरोना बाधित आढळून ...मंठा तहसीलदार सुमन मोरे .वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चाटसे .तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिपक लोणे वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील चव्हाण डॉ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्य सहाय्यक दत्ता सरकटे भारत गागुर्डे अर्जुन हर्मीगे सुजीत वाघमारे जिजाभाऊ लिपणे आरोग्य कर्मचारी प्रदिप सोनवणे रणजित देशमुख श्रीमती आशा मुढे रेणुका उबाळे सह सर्व आरोग्य कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका. शिक्षण .ग्रामसेवक आदी नी मेहनत घेतली.
Leave a comment