कुंभारपिंपळगांव । वार्ताहर
आपल्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आरोग्य विभागात काम करणार्या 72 हजार आशा व 3500 गट प्रवर्तक संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात दिनांक 16 रोजी सिटू संघटनेच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे,या संपात सिटू सह राज्य भरातील पाचही संघटना संपात सहभागी होणार आहेत.वारंवार सरकार ला निवेदने अर्ज देऊन आंदोलन करूनही अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही कोरून रोगाच्या मोहिमेत अत्यंत तूट पुंज्या मोबदल्यावर,कुठलेही संरक्षण साहित्य नसतानाही या आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी आपले प्राण पणाला लावून ह्या भगिनी काम करत आहेत परंतु सरकार मात्र त्यांना तुटपुंजा फक्त 1000 एवढा मोबदला देत आहे. मागील सर्कच्या काळात आशा सेविकास मानधनात 2000 व गट प्रवर्तकास 3000 वाढ करण्याचे सरकारने योजिले होते 16 सप्टेंबर 2019 रोजी आशा च्या मानधन वाढीचा जी आर पण निघाला होता पण त्याची अद्यापही अमलबजावणी नाही.गट प्रवर्तकांच्या तर या जी आर मध्ये उल्लेख पण नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस ,राष्ट्रवादी या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात या सेविकांच्या सेवा शर्ती सुधारण्यासंदर्भात मुद्दा घेतला होता.शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अनेकवेळा आशाच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता तसेच मुख्यमंत्री शपथविधीच्या वेळीही याआशा सेविका व गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीचा निर्णय घेऊ असे आपल्या भाषणात सांगितले होते आरोग्य मंत्री टोपे यांनीही अनेकवेळा वाढ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप पर्यंत सरकारने कुठलेही पाऊल उचललेले नाही. वेळोवेळी कोरोनाचा भान करून वेळ मारून नेण्याचे काम आरोग्यमंत्री यांनी केले आहे. तेव्हा आता जर सरकार कडून 2 जुलै पर्यंत निर्णय झाली नाही तसे इतरही प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाहीत तर नाईलाजास्तव 3 जुलै पासून संप पुकारण्यात येणार आहे.या संपाचा फटका या कोरोनाचा सर्वेक्षणावर व उपाय योजनांवर पडण्याची शक्यता आहे तेव्हा सरकारने वेळीच जागी व्हावे असे इशारा सिटू संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मधुकर मोकळे,गोविंद आर्द्ड मंदाकिनी तिनंगोटे मीना भोसले अजित पंडित आदींची उपस्तीती होती.
Leave a comment