जालना । वार्ताहर

शहरात वाढत असलेल्या कोरणा रुग्णांची संख्या पाहता या व्हायरस ची साखळी तोडण्यासाठी व्यापारी महासंघाने तीन दिवशीय  जालना शहर पूर्णपणे बंदचे आव्हान व्यापार्‍यांना व जनतेस  केले होते. या काळात शहरातील नवा  जालना, जुना जालना, शहरातील गल्लो गल्ली असणा-या लहान मोठ्या व्यापारी प्रतिंष्ठाने तसेच  कृषी उत्पन्न बाजार समितीतील जवळपास सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद  होती.  या जनता कर्फ्यू मूळे काही  व्यापारी व ग्राहकची गैरसोय झाली असेल परंतू   सर्वांच्या आरोग्याच्या हितासाठी हे पाऊल उचलने आवश्यक होते.व्यापारी असोसिएशनच्या सर्व पदाधिका-यांनी, व्यापार्‍यांनी व जनतेने या तीन दिवसीय स्वयंस्फूर्त जनता  कर्फ्यू मध्ये शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे व्यापारी महासंघातर्फे आभार. कोरोनाव्हायरस शहरातील व्यापारी प्रतिष्ठानात सुद्धा आपले अस्तित्व निर्माण करु लागला होता व पुष्कळ दुकानदार या व्हायरसचे शिकार होण्याच्या मार्गावर  होते. तज्ञांच्या मते तिन दिवस दुकाने बंद असल्यामुळे कोरोनाव्हायरस ची साखळी  तूटण्यास निश्चितच मदत होईल व थोडीफार का होईना रुग्णांच्या संख्येत निश्चितच  घट होईल असे व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांना वाटते.

तसेच  दुकाने बंद केल्याने  म्हणजेच जनता कर्फ्यू  केल्याने  हा कोरोनाव्हायरस चा प्रभाव  कमी होईल  पण  त्याचे अस्तित्व संपणार नाही. त्यासाठी  व्यापारी महासंघाचे सर्व व्यापारी बांधवांना व जनतेस आव्हान आहे  की  पुढील काळात  व्यापार सुरळीत होणार असून  त्यावेळेस  व्यापार्‍यांनी व जनतेने  आपली व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी  तज्ञांनी सुचवलेले सुरक्षेतेचे   नियम पाळूनच आपले व्यवहार चालू करावे. त्यामध्ये सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे, वेळोवेळी हात साबणाने कमीतकमी  20  सेकंद धूणे या सॅनिटाइज  ने साफ करणे हे सर्व नियम जर काटेकोरपणे पाळले  तरच  लवकरच कोरोना व्हायरसे अस्तित्व आपण नष्ट करू शकू.  व्यापारी महासंघाच्या  किंवा जनतेच्या व व्यापार्‍यांच्या स्वयस्फूरतीने  केलेल्या  तीन दिवशिय जनता कर्फ्यूस जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे ,उपजिल्हाधिकारी परळीकर साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख एस.चैतन्य, शहर पोलीस प्रशासन, तसेच नगरपालिका प्रशासन यांनी सर्वतोपरी मदत केली तसेच जालना जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष माननीय अर्जुन रावजी खोतकर तसेच नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल व शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची हे बंद यशस्वी करण्यासाठी मदत मिळाली  त्यासाठी व्यापारी महासंघातर्फे या सर्व शासकीय व लोकप्रतिनिधी ना धन्यवाद देत  आहे. या बंद या काळात आ.कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल व नगर पालिका प्रशासन यांनी शहरातील बाजारपेठा  सॅनिटाईज करून देण्यासाठी मदत केली.  शहरातील न्यूज चॅनल व व वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी ही या कोरोना व्हायरसची गंभीरता आपाअपल्या चॅनेल  व वृत्तपत्राच्या माध्यमातून  जनतेस लक्षात आणून दिली व जनतेस या बंदमध्ये सहभाग नोंदवण्यास प्रोत्साहन दिले त्याबद्दल या सर्वांचे आभार व्यापारी संघा कडून केले जाते. तीन दिवसीय जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश जी तवरावाला वाला शहराध्यक्ष सतिष पंच, कार्याध्यक्ष विनीत सहानी, राजेश राऊत, महासचिव संजय दाड, कोषाध्यक्ष विजयजी राठी, सहकोषाध्यक्ष  श्याम लोया, कांतीलाल राठी, योगेश ठक्कर, राजेश पंजाबी, गोवर्धन करवा, बाल अर्जुन बजाज, शिवदयाल कामड, दीपक भुरेवाल, महेश भक्कड, जयप्रकाश मोटवानी, सुभाष वाघमारे ,रमेश अग्रवाल, मनोज सावजी, मनोज लाड, सतीश  बीदादे, गणेश दरक, कृष्णा पळसखेडकर, हूरगट साहेब व व्यापारी महासंघाच्या इतर पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.