33 जणांनी सादर केले प्रवचन, भजन, संगीत; 41 हजार नागरिकांनी घेतला लाभ
जालना । वार्ताहर
कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात घर बसल्या भगवंतांचे नामस्मरण तसेच भगवत भक्ती करता यावी म्हणून युवा भागवतकार अजिंक्य महाराज यांनी 19 मे पासून ऑनलाइन सत्संग सोहळ्यास प्रारंभ केला होता. 20 जून रोजी नवविधा भक्तीच्या प्रवचनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. जय श्रीकृष्ण फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शासनाच्या सूचनेनुसार कोरोना रोखण्यासाठी घरातच बसणे अनिवार्य होते. त्यानुसार अजिंक्य महाराज यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. या ऑनलाइन सत्संग सोहळ्यास संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 33 जणांनी कीर्तन, भजन, प्रवचन तसेच शास्त्रीय संगीत सादर करून अनेकांची मने जिंकली. सर्व कार्यक्रमांचा 41 हजार 800 जणांनी अस्वाद घेतला.यात बालकलाकारापासून दिग्गज कलाकारांनी एक नवीन व्यासपीठ म्हणून आपली कला सादर केली.
ऑनलाइन सोहळ्यात दत्ता महाराज गोंदीकर, डॉ.कुमावत, हिवरेकर महाराज,संकेत शार्दुल, नरवडे, प्रा.प्रसाद चौधरी,शाश्वत गाडगे,दीपक राऊत, प्रशांत महाराज, जाधव, अमोल माळी, ऋषी तौर, गजानन केचे,गजानन गोंदीकर, दीपक रणनवरे,संतोष बुजाडे, शंकर गिरी, अंजली गायकवाड,नंदिनी गायकवाड, अंगद गायकवाड, पं.डॉ. पराग चौधरी, श्रावणी मूधळवाडकर,प्रसाद कुलकर्णी, प्रवीण महाराज गोसावी (एकनाथ महाराजांचे 13 वे वंशज ), जय कराड,ललित चोबे , जयश्री ताई कुमावत,ज्योती ताई देशपांडे, शिवा अग्रवाल, रागिणी कौसडीकर, श्रीकांत चापाईतकर, राघव महाराज गोसावी, प्रवचन (नाथ महाराज चे 14 वे वंशज )पैठण,ऋषीबाबा शिंदे, वेदांत कुलकर्णी, कृष्णेंद्रजी वाडीकर, शास्त्रीय गायन धारवड कर्नाटक आदींनी आपली कला सादर केली. अजिंक्य महाराज देशमुख यांच्या प्रवचनाने सांगता करण्यात आली. याविषयी अजिंक्य महाराज म्हणाले की, एकादशी व द्वादशीला पेज वर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पेजमुळे नवकलाकारांना मोठी संधी मिळाली. सोहळा यशस्वी करण्यासाठी राजू महाराज देशमुख, वेदांत कुलकर्णी, अमोल देशमुख, प्रशांत जाधव आदींनी पुढाकार घेतला.
Leave a comment