हा खून की अपघात याचा तपास सुरु, शुक्रवारी रात्रीची घटना
परतुर । वार्ताहर
परतुर ते आष्टी रोडवर सिंगोना पाटीजवळ पिंप्रुळा येथील नितीन संदीपान घाडगे वय 32 या तरुण मृत अवस्थेत आढळून आला. मयताचा खून करण्यात आला अशा आशयाच्या तक्रारीवरून परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान हा खून की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. घटना शुक्रवारी रात्री घडली.
अनिल जनार्धन लहाने रा. सुरुमगाव ता .परतुर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सिंगोना जवळ आष्टी परतुर रोडवर गेलो असता मला आमच्या आत्याचा मुलगा नितीन घाडगे हा अपघातस्थळी मृत आढळून आला. त्याने वापरलेली मोटारसायकलचे काही तुकडे इतरत्र पडलेले दिसले, मयत घाडगे याच्या डोक्याला जखम होती,मयताचा अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला असून त्याचा खून केल्याचा आरोप लहाने यांनी तक्रारीत केला तर हा खून प्रदीप ङ्गुलमाळी रा.परतुर यानेच केल्याचा आरोप ही तक्रारीत केला आहे. यावरून आरोपी प्रदीप ङ्गुलमाळी याला संशयित म्हणून या प्रकरणात पोलिसांनी रात्रीच अटक केली. तक्रारदार लहाने यांनी केलेल्या तक्रारीत हा खुनाचा प्रकार असल्याचे नमूद केल्याने त्या दृष्टीने तपास अधिकारी पीएसआय बाळासाहेब जाधव यांनी तपास करून शुक्रवारी रात्रीचं आरोपी प्रदीप ङ्गुलमाळी रा.परतुर याला या प्रकरणात गजाआड केले. आरोपी प्रदीप ङ्गुलमाळी याला परतुर न्यायालयात आज हजर करण्यात आले असता त्याला 24 जून पर्यन्त पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती तपास अधिकारी पीएसआय बाळासाहेब जाधव यांनी दिली. दरम्यान हा खून की अपघात याचा उलगडा पोलीस तपसात उघड होईल, खुन असेल तर कोणत्या कारणासाठी करण्यात आला व यात आणखी कोणी सामील होते का या बाबी तपासात निष्पन्न होतील. आरोपी सोबत कोणी सामील होते का, आरोपी ङ्गुलमाळी वर यापूर्वी ही अनेक कलमाखाली परतुर पोलिसात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
Leave a comment