जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
जालना । वार्ताहर
जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटच्या वतीने शुक्रवारी रोजी कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे उद्धघाटन आणि अन्न पाकीट वाटप आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. श्री स्वामी समर्थ ब्लड बँक जालना येथे शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना अ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, कॉग्रेस पक्षाचा बलीदानाचा इतिहास आहे. देशाची अंखडता आणि राष्ट्रीय एकत्माता मंजबुत करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने देशाला धर्म निरपेक्ष विचार देवुन देशाची राज्यघटना आबाधीत ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा केली आहे. खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसाच्या निमित्त रक्तदान करुन कार्यकर्त्यानी भारतीय राज्य घटना देशात कायम टिकवीण्यासाठी ही एक रक्तदानातुन शपथ आहे.
कॉग्रेस कार्यकर्ते समाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात हे आजच्या या रक्तदान शिबीरातुन उघड झाले आहे. असे ही आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर कॉग्रेस कमिटचे अध्यक्ष शेख महेमुद यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कॉग्रेस कमिटचे कार्याध्यक्ष राजेंद राख, प्रदेश सचिव विजय कामड, सत्सग मुंढे, बदर चाऊस, दिनकर घेवदे, आनंद लोंखडे, डॉ.विशाल धानुरे, एकबाल कुरेशी, तालुक्याध्यक्ष वसंत जाधव, विठ्ठल सिंह राना, नगर सेवक विनोद रत्नपारखे, संदीप खरात, अरुन मगरे, शेख शकील, राजू पवार, गणेश चौधरी, दिलीप मोरे, विठ्ठल बापू डोंगरे, नासेर बेग, शहेनाज शेख, सय्यद निजाम, शिवराज जाधव, गणेश भालेराव, चंद्रकात रत्नपारखे, विजय लहाने, अरुण घडलिंग, संदीप वाघ, अंकुश गायकवाड आदी कायकर्ते उपस्थित होते. यावेळी या रक्तदान शिबीरामध्ये कॉग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्योनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरा नंतर गरजुना अन्नाचे पाकीटवाटप करण्यात आले. श्री स्वामी ब्लड बँकेचे प्रकाश भागे, आंनद घाडगे, अनिकेत पाखरे, ङ्ग्रान्कीक कांबळे आदी कर्मचारी रक्तदान शिबीरामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलान गणेश चौधरी यांनी तर तालुकाध्यक्ष वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Leave a comment