परतुर । वार्ताहर

परतुर तालुका सध्या कोरोना मुक्त असल्याने  प्रशासन डोळेझाक करत असल्याचा गैरङ्गायदा घेतला जात असल्याचे शहराच्या मोंढा भागात आठवडी बाजारात पहायला मिळाले.विना मास्क,सोशल डिस्टन्स चा बाजारात ङ्गज्जा उडाला तर ङ्गळ विक्रेत्यांनी परतुर शहरातील स्टेशन रोडवर दुतर्ङ्गा चारचाकी गाड्यातून विक्री सुरू केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परतुर शहरात गाव व मोंढा असे दोन आठवडी बाजार भरत असतात,कोरोना मुळे गेले अडीच महिने बाजार बंद होते परंतु गेल्या आठवड्यापासून मोंढा भागातील बाजार भरतो आहे. याला कोणी परवानगी दिली तेही कळत नाही,मात्र शनिवारी शहरात मोंढा भागात भरलेल्या बाजारात विक्रेते व ग्राहक यांची मोठी गर्दी पहायला मिळाली तोंडावर मास्क न घातलेल्यांची संख्या जास्त असताना त्यांना अटकाव करणारी यंत्रणा कुठेही नव्हती.सोशल डिस्टन्स कुणीही पाळताना दिसत नव्हते. परतुर शहर व तालुका सध्या कोरोना मुक्त असल्याने प्रशासन कुठेही सतर्क पहायला मिळत नाही.

नेमका याचाच गैर ङ्गायदा नागरिक व विक्रेते घेत आहेत,पण या गर्दीत एखादा कोरोना रुग्ण मिसळला तर तर मोठा संसर्ग ङ्गैलावण्याची  भीती असल्याने नगरपालिका, पोलीस प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे होते. पण तसे कुठेही दृष्टीस पडले नाही. तर दुसरीकडे शहराचा मुख्य रस्ता सिंगोना चौक ते महादेव मंदिर पर्यंत ङ्गळविक्रेत्यांची दुतर्ङ्गा झालेली गर्दी व त्यामुळे रस्ता वाहतुकिला होणारी अडचण पहाता त्यांच्यावर कुठेतरी निर्बंध घातले जावे अशी मागणी सामान्य नागरिक करत होते.शहरातील व्यापरिवर्ग ही या ङ्गळविक्रेत्यांच्या रस्त्यावर च्या गर्दी ने अडचणीत आलेला दिसला. रस्त्यावर च्या दुतर्ङ्गा ङ्गळविक्रेत्याना कोणी परवानगी दिली असा प्रश्‍न आता पुढे येत आहे.  जालना जिल्ह्यात एकीकडे कोरोना थैमान घालत असताना परतुर तालुका मात्र कोरोना मुक्त आहे,याचं कारणाने प्रशासन कडक खबरदारी घेताना दिसत नाही. दुसरीकडे कोरोना आता आपल्याकडे येणारच नाही ही भावना अनेक नागरिकांत दिसून येत अडल्याने ते कोणत्याही प्रकारची काळजी घ्यायला तयार नाहीत . शहरात दुचाकी,तीनचाकी,चारचाकी मधून घातलेल्या प्रवासी मर्यादा पाळली जात नाही,रस्त्यावर विनाकारण मास्क न घालता ङ्गिरणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. पोलीस प्रशासन थोडेबहुत शिस्त लावण्याचे काम करत असले तरी त्याच्या जोडीला नगरपरिषद व महसूल विभागाने मात्र याकडे साङ्ग दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे. जालना जिल्ह्यात वाढलेली संख्या विचारात घेता प्रशासनाने जास्त ढील देण्याचा धोका घेऊ नये अशाप्रकारची मागणी सुज्ञ नागरिक करतांना दिसत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.