कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील शेतकर्यांनी मागील वर्षी चा पीक विमा खात्यावर जमा करण्यात आला आहे .त्यात अनेक शेतकर्यांनी विमा कंपनीने चेष्टा केली आहे शेतकर्यांनी मागील वर्षी तूर, बाजरी, सोयाबीन ,मुग , कापूस आदी पिकांचा पिक विमा भरला होता शेतकर्यांना विमा भरल्याच्या पावत्या ही देण्यात आल्या दोनशे ते तीनशे रुपये एका शेतकर्यांना पीक विमा भरण्यासाठी खर्च येतो व वेळ पैसा मेहनत वाया जाऊन शेतकर्यांची एक प्रकारे चेष्टा केल्याप्रमाणे भरलेल्या रकमेच्या अर्धे पैसे पिक विमा परत देत आहे.
विमा कंपनीने शेतकर्यांना पीक विमा भरून घेतला मात्र त्याचा परताव भरलेल्या रकमेच्या 50 टक्केच परत दिल्या जात असल्याने अनेक शेतकर्यांची चेष्टा केल्यागत होत आहे गुंज येथील दत्तात्रय रंगनाथ जाधव या शेतकर्यांनी तूर, बाजरी, मूग ,कापुस ,सोयाबीन , आदी पिकांचा 832 रुपये पिक विमा मागील वर्षी भरला होता. त्याचा विमा खात्यावर ङ्गक्त 505 रुपये जमा झाला आहे. कापुस सरळ सरळ वगळण्यात आला आहे.तर बाकीच्या पिकांना अल्पशा विमा कंपनीने शेतकर्यांना देऊन बोळवण कैदी आहे. विमा कंपनीच्या हेल्पलाइनवर संपर्क केला असता तो होत नसून ती हेल्पलाइन बंद आहे तक्रार कोणाकडे करावी अशी नाराजी शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. शेतकर्यांच्या समस्या मांडण्यासाठी कुंभार पिंपळगावला विमा कंपनीचे संपर्क कार्यालय असावे असे ही शेतकर्यांनी म्हणटले आहे.
Leave a comment