जालना । वार्ताहर
संस्कार प्रबोधिनी विद्यालयात दि. 15 जून पासून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली असून यास विद्यार्थ्यांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने झुम या नाविण्यपूर्ण अॅपव्दारे ऑनलाईन अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे.
शहरातील प्रसिध्द संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील शिक्षकांनी शासनाच्या या ऑनलाईन उपक्रमास भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गेल्या 15 जून पासून संस्कार प्रबोधिनी विद्यालयात ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली आहे. सध्या आठवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम ऑनलाईन पध्दतीने सुरु असून लवकरच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना देखील झुम अॅपव्दारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संस्कार प्रबोधिनी विद्यालयाने शासनाच्या नियमापूर्वीच म्हणजे 29 मार्चपासूनच व्हॉटसाप ग्रुपव्दारे ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. या उपक्रमास आता ऐंशी दिवस पूर्ण होत आहेत. शिक्षकांना जालना एज्युकेशन ङ्गाऊंडेशनच्यावतीने ऑनलाईन पध्दतीचे प्रशिक्षण देऊन हा उपक्रम शाळेत सुरु करण्यात आला आहे.
Leave a comment