भाजपाकडून चीन देशातील वस्तूची होळी करून व्यक्त केला निषेध 

जालना । वार्ताहर

चीन देशाची मस्ती उतरविण्यासाठी हिंदुस्तानचे जवान सज्ज झाले असून पाकिस्तान प्रमाणें चीन ला धडा शिकविल्याशिवाय हिंदुस्तानचे जवान शांत बसणार नसून भारतीययांनी आपल्या घरातील चीनी वस्तूची होळी करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा भाजपा नेते आ.बबनराव लोणीकर यांनी भाजपा जिल्हा कार्यालयासमोर चीन देशाचा निषेध व्यक्त करताना व्यक्त केला. 

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसभापती भास्करराव पाटील दानवे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हा सरचिटणीस बद्रीनाथ पठाडे, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, वीरेंद्र धोका, अतिक खान, बाबासाहेब कोलते, नारायण पवार, रवींद्र अग्रवाल, सचिन जाधव, अमोल कारंजेकर, सुभाष सले, सुनील पवार, संजय डोंगरे, प्रशांत आढावे, मोतीराम बेराड, दत्ता जाधव, संदीप भोसले, विठ्ठल नरवडे, तलरेजा आदि उपस्थित होते.   शासनाच्या नियमाचे व सोशल डीस्टीगचे पालन करून यावेळी चीन विरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना आ.लोणीकर म्हणाले की, चीन सैनिकांनी आपल्या भारत देशाचे अगोदर 20 सैनिक शहीद केले त्याचा बदला म्हणून भारतीय नवजवानांनी 43 चीनी सैनिकांना ठार केले पाकिस्तान प्रमाणे चीनची मस्ती उतरविण्यासाठी भारताचे जवान सज्ज झाले असून यापुढे चीन देशाचे साहित्य मोबाईल व टेप रेकॉर्ड, टीव्ही व इतर साहित्याचा भारतीयांनी वापर न करता त्याची होळी करावी. भारतातील सर्व समाज बांधवांनी चीनी वस्तूवर यापुढे बहिष्कार टाकावा, चीन ने कोरोना सारखी महामारी जगभर पोहचवून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था संकटात आणली आहे, यापूर्वी पाकिस्ताननी भारतावर हल्ला केला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानला खंबीरपने धडा शिकविला त्याच प्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन ला धडा शिकाविल्याशिवाय राहणार नाही. चीन ला माज आणि मस्ती चढल्यामुळे त्याची मस्ती भारतीय सैनिक उतरविल्याशिवाय राहणार नाही असे हि माजी मंत्री आ.लोणीकर म्हणाले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.