जालना । वार्ताहर
शहरातील सुवर्णकार नगर मधील लहान मुली सह विवाहिता ही दि 12 रोजी पासून बेपता झाल्याची तक्रार तिच्या पती पोलीस ठाण्यात दिली आहे, सुवर्णकारनगर येथील रहिवासी संतोष कोंडीबा मस्के वय 32 वर्षे यांची पत्नी व लहान मुलगी ही दि. 12 रोजी सकाळी कुणालाही काहीएक न सांगता घरातून निघून गेली त्यांनी नातेवाईकाकडे शोध घेऊन मिळून न आल्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दि 15 रोजी हरवल्याची तक्रार दिली.
सदरील तक्रारी वरून तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार यांच्याकडे दिली आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने पवार यांनी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने तपास करून सदर बेपत्ता महिला व लहान मुलगी औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्याने औरंगाबाद येथे शोध घेऊन पत्नी व मुलीस पती संतोष कोंडीबा म्हस्के यांच्या ताब्यात दिल्याने त्यांनी पोलिसांच्या कामगिरी विषयी समाधान व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले.
Leave a comment