वीज वितरणचा गलथान कारभार वाहातूक नियंत्रकांने लेखी निवेदन देऊनही लाईट सुरु होईना
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव बस स्थानक गेल्या पाच महिन्यांपासून अंधारात आहे . 12 ङ्गेब्रुवारी 2020 रोजी कुंभार पिंपळगाव बस स्थानकाची लाईट उसाच्या ट्रकने तारा तुटल्याने बंद झाली होती. याबाबत संबंधित विभागाला कल्पनाही देण्यात आली होती. विज वितरण उंठावरून शेळ्या राखण्याचे काम करत आहे.
वरिष्ठांनी या कडे लक्ष देण्याची गरज असून त्यांचे ही या कडे दुर्लश होत आहे. याच वेळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील विजेचा खांब ही वाकलेला तसाच आहे. एखादी दुर्घटना होऊ शकते. तारा तुटून बसस्थानकात पाच महिन्या पासून तशाच जागेवर पडलेल्या आहेत .वीज वितरणचे कर्मचारी रोज डोळ्याने पाहत असून तरीही डोळेझाक करत आहे.या बाबत कुंभार पिंपळगाव येथील वाहतूक नियंत्रक व्हि.एन.कायंदे यांनी लाईट सुरू करावी म्हणून 20 ङ्गेब्रुवारी ला लेखी विनंती अर्ज ही शाखा अभियंता घंनसावंगी यांना देण्यात आला आहे पाच महिन्यापासून बसस्थानक अंधारात आहे तर लेखी निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने वाहतूक नियंत्रक यांनी खंत व्यक्त केली आहे लॉकडाऊनच्या काळात लाईट नव्हती ते ठीक आहे परंतु आता काही बसङ्गेर्या सुरू झाल्या असून नियंत्रण कक्षात दिवसभर बसावे लागते बसस्थानकामध्ये तात्काळ लाईट सुरू करण्यात यावी या अंधाराचा ङ्गायदा घेत बसस्थानकामध्ये तळीराम आणि आपला तळ ठोकला आहे सर्वत्र काचांच्या बाटल्या ङ्गुटलेल्या आहेत .अंधाराचा ङ्गायदा घेत बसस्थानकात कचरा आणून टाकला जात आहे. बसस्थानकाची लाईट तात्तकाळ सुरू करण्यात यावी अशी मागणी वाहातूक नियंत्रक व्हि.एन.कायंदे यांनी लेखी निवेदना व्दारे केली आहे.
Leave a comment