दिवसभरात 45 हजार 400 रुपयांचा दंड वसुल
जालना । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न पाळणार्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनामार्ङ्गत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत असुन दि. 19 जुन, 2020 रोजी 152 व्यक्तींवर कारवाई करत 45 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी, नगर परिषद, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न राखणार्या 109 व्यक्तींकडून 21 हजार 900 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्या 43 व्यक्तींकडून 21 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ङ्गुलबाजार ते सदरबाजार पोलीस स्टेशन येथील नालीच्या बाहेर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यासाठी मोहिम राबविण्यात आली असुन या मोहिमेमध्ये 150 दुकानाचे अतिक्रमण काढून घेण्याबराबरच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हातगाडीवर भाजीपाला व ङ्गळविक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्ङ्गत देण्यात येणार्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहनही मुख्याधिकार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Leave a comment