जालना । वार्ताहर
संपुर्ण देशात कोरोना विषाणंचा प्रादुर्भाव झालेला असुन महाराष्ट्र राज्यात देशातील एकुण रुग्णापैकी सर्वाधिक रुग्ण आढळुन आले आहेत .त्याचा परीणाम म्हणुन जालना शहरात अनेक कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले आहे. शहरातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोरोना ग्रस्त रुग्ण आढळलेला जालना शहरातील काही भाग सिलबंद करण्यात आला आहे.तरी या भागातुन पुढे जाणारे वाहतूकीस अडथळा निर्मीण होणार नाही यासाठी मुंबई पोलीस कायदयाचे कलम 33 (1) सह कलम 36 अन्वये प्रदान केलेल्या शक्तीनुसार एस .चैतन्य, पोलीस अधिक्षक जालना यांनी जालना शहरातील सध्या प्रचलीत मार्गवरील जाणारी व येणारी वाहतूक दि.20 जुन 2020 रोजी 06.00 वाजेपासुन पुढील आदेशापर्यत खालील नमुद पर्याय मार्गाने वळविण्याचे आदेश पारीत केले आहेत.
सध्याचा प्रचलित मार्ग :- पाणीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यायी मार्ग पाणीवेस-महावीर चौकमामाचौक-ङ्गुलबाजार पाणीवेस-महावीर चौक-मामाचौक-मुर्गीतलाव पाणीवेस ते राजमहल टॉकीज ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सध्याच्या प्रचलीत मार्गावरील सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात आले असुन वरील रस्त्यावरुन जाणार्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा जाण्यास व येण्यास वापर करावा, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Leave a comment