26 पैकी तब्बल 25 रुग्ण हे शहरातील असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले
आज सकाळी 26 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आल्याने शहरात खळबळ उडाली
जालना । वार्ताहर
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 26 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.यात 26 पैकी तब्बल 25 रुग्ण हे जालना शहरातील असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात नवीन रुगणाची भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या 350 वर गेली आहे.
जिल्हा रुग्णालयाने प्रयोग शाळेकडे पाठविलेल्या नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील खडकपुरा येथील 6,आंनद नगर 3,लक्कडकोट 4, समर्थनगर 2, रामनगर 5 (जालना शहर ), कन्हेय्यानगर,आरपी रोड, क्रांतीनगर,सरकारी रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या डॉक्टर चा 1 नातेवाईक मंगलबाजार,जाफराबाद तालुक्यातील टेभूर्णी येथील प्रत्येकी एक असे एकूण 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात जालना शहरातील एक सत्ताधारी नगरसेवकांच्या जवळच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे समाजते.जालना शहरात मागील काही दिवसापपासून झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे नावरीकामध्ये भीतीचे वातावरण आहे.
Leave a comment