जालना । वार्ताहर

जालना जिल्ह्यात वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही अतिशय चिंतेची बाब आहे. सहवासितांचा शोध घेणे, संस्थात्मक अलगीकरणाबरोबरच कंन्टेन्टमेंट झोनमध्ये निर्बंध अधिक कडकपणे राबविण्याचे  निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिले. विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर यांनी आज दि. 18 जुन रोजी जालना येथील कोव्हीड रुग्णालयास भेट देऊन तेथील रुग्णांना देण्यात असलेल्या उपचाराची तसेच आरटीपीसीआर लॅब उभारणीची पहाणी केली.  तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अधिकार्‍यांना मार्गर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. जगताप आदींची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर म्हणाले, जिल्ह्यात  कोव्हीड बाधितांचा संख्या वाढतच आहे.  ही अतिशय चिंतेची बाब आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग हा कंन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करुन या भागातुन एकही नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्याबरोबरच या भागात कडक निर्बंध लागू करण्यात यावेत. कोव्हीड बाधितांच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क सहवासितांचा शोध अचुकपणे घेण्यात यावा. त्याचबरोबर मधुमेह, र्‍हदयरोग असे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती व ज्यांना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आहे अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे तातडीने संस्थात्मक अलगीकरण करण्याबरोबरच वेळप्रसंगी अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीकोनातुन पावसाळयामध्ये जिल्ह्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा.  प्रामुख्याने प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरातमध्ये घनवन प्रकल्प राबविण्यात यावा.  तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्ह्यामध्ये करण्यात येणार्‍या 600 सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरींची कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेमुळे जालना येथील रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी आवश्यकता भासणार नाही. संशयित व्यक्तीच्या लाळेच्या नमुन्यांचे अहवाल तातडीने या प्रयोगशाळेमुळे उपलब्ध होणार असल्याने बाधितांना त्वरेने उपचार देता येणार असल्यामुळे या प्रयोगशाळेची उभारणी त्वरेने करण्यासाठी आरोग्य विभागाने काम करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले आजघडीला जिल्ह्यात कोव्हीडबाधितांची एकुण संख्या 325 असुन एकुण क्टीव्हरुग्णांची संख्या 123 एवढी तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे व उर्वरित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोव्हीड रुग्णालयाच्या माध्यमातुन रुग्णांना अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार देण्यात येत असुन रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढून रुग्ण बरे व्हावेत यासाठी पौष्टीक आहारसुद्धा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगत कोरोनाला हरवण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटरच्या माध्यमातुन एसपीओ2, ब्लड सॅच्युरेशनचे प्रमाण कळत असल्याने प्रत्येक नागरिक घरातल्या घरात तपासणी करु शकतो. 94 पेक्षा लेव्हल कमी असेल व आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयास संपर्क साधावा. तसेच सर्व्हेक्षणासाठी येणार्‍या कर्मचार्‍यांना आपली खरी माहिती द्या. जेणेकरुन आपल्याला काही त्रास असल्यास त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार असुन जनतेने प्रशासनामार्फत देण्यात येणार्‍या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.