परतूर । वार्ताहर
चिनने लडाखच्या गलवान खोर्यात केलेल्या भ्याड हाल्याला भारतीय लष्कराने चिनला चोख प्रत्यूतर देत चीनच्या 43 जवानांना कठंसकन घातले मात्र या चकमकित भारतीय 20 जवान शहीद झाले आज भारतीय जवानांना श्रध्दांजली अर्पण केल्या नंतर आ. लोणीकर म्हणाले कि आपण सर्वांनी चिनी साहीत्य वापर न करता त्याचा पूर्ण पणे बहीष्कार करावा परतूर येथील महादेव मंदिर चौका मध्ये चिनचे राष्ट्रध्यक्ष सि झिंपिंग यांच्या पुतळया चे दहन व चिनी साहीत्याची होळी करण्यात आली या प्रसंगि आ.लोणिकर बोलत होते.
पूढे बोलताना ते म्हणाले कि चिनची मुजोरी भारत खपवून घेणार नसून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व भारतीय लष्कर जसास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले मुख्यत्वे करून भारत ही चिन साठी सर्वात मोठी बाजार पेठ पासून दैनदिन गरजांच्या वस्तू खरेदी करण्यास बंदी घातल्यास चिनी ची मस्ती उत्तरेल आशा शेलक्या शब्दात आपला क्रोध व्यक्त केला तसेच आपल्या मोबाइल मधे चीनी अॅपचा सर्वात जास्त भरणा असून आपण हे सर्व अॅप काढून टाकत भारतीय अॅपचा वापर करावा असे ही ते म्हणाले. या वेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणिकर,रंगनाथ येवले भगवानराव मोरे,डॉ.सुखराज कोटेचा,द.या.काटे,दिलीप होलाणि,डॉ.संजय पूरी,ओम मोर,संपत टकले,शत्रूघ्न कणसे,राजू मुंदडा,कृष्णा आरगडे,डॉ.स्वप्नील मंत्री,शामसुंदर चीतोडा,सू.द.शिवनगिरीकर,अजीत पोरवाल,राजेश वाघमारे,मंगेश वाघमारे,अभीषेक सोंळके,कुष्णा कुरधने,अमोल अग्रवाल,गणेश खवल,सुर्यभान कदम,जयकिशोर अग्रवाल,गणेश सोंकके,अमर बगडीया,शूभम कठोरे आदी उपस्थित होते.
Leave a comment