मंठा । वार्ताहर
लॉकडाउन असल्याने तालुक्यातील आठवडी बाजार बंद असल्याने जीवनावश्यक वस्तू म्हणून औषधी,शेतीसाठी लागणार्या वस्तू, किराणा तसेच भाजीपाला व ङ्गळ विक्रीस परवानगी देण्यात आली असून शहरातील हातगाडीवाले, भाजीपाला व ङ्गळविक्रेते मुख्य रस्त्यावर व मार्केट यार्ड परिसरात गाडा व दुकान लावीत आहेत. या परिसरात बँका तसेच औषधी, शेती साहित्य व किराणा दुकाना असल्याने दिवसभर या ठिकाणी मोठी गर्दी होते.
सोशल डिस्टन्सिगंचे पालन होत नसल्याने नगरपंचायतने भाजीपाला, ङ्गळ विक्रेते व हात गाडीवाल्यांना जिनिंग-प्रेसिंग मोकळ्या जागेत दुकाना लावण्याची सुचना दिली आहे. जिनिंग प्रेसिंग या मोकळ्या जागेत अस्वच्छता धूळ व पाऊस पडला तर चिखल होत असल्याने ही जागा व्यावसायास योग्य नसल्याने नगरपंचायतने हातगाडीवाले ,भाजीपाला व ङ्गळ विक्रेत्यांना योग्य व स्वच्छ जागा द्यावी अशी मागणी मानव मुक्ती मशीनच्या वतीने करण्यात आली आहे. नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी यांना काल दि 17 रोजी दिलेल्या निवेदनावर मानव मुक्ती मशीनचे सय्यद रङ्गिक, सुनील घायाळ, प्रदिप बोराडे आदींच्या सह्या आहेत.
Leave a comment