वादळीवार्यासह अवकाळी पावसाने झालेल्या ङ्गळबागांचे नुकसान भरपाई 2 वर्षापासून आजही शेतकरी वंचितच
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह जांबसमर्थ ,भेंडाळा घाणेगाव आदी गावातील ङ्गळबागांची नुकसान भरपाई मिळेना.. घनसांगी तालुक्यातील जनतेला आजी व माजी पालकमंत्र्यांनी झुलवत ठेवले याची शेतकर्यांना प्रचिती आल्याचे साक्षात उदाहरणे असून आजही त्यांनी खोटे आश्वासन दिल्याचे निष्पन्न होत आहे. अशा खोट्या आश्वासनांना मुळेच घनसांगी तालुक्यातील जनतेची ङ्गसवणूक होत असून त्यांची ङ्गरपट होत आहे.
या शेतकर्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे .त्याचे असे की कुंभार पिंपळगावची 10 दहा वर्षापासून पाणीपुरवठ्याची एक कोटी रुपयाची योजना आजही पूर्णत्वास नेली नाही. रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी असमर्थ आहेत असे दिसून येत आहे तसेच भेंडाळा, जांब समर्थ येथील पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहेत अनेक वर्षा पासून उक्कडगावचा रस्ता पूर्ण होत नाही, राजाटाकळी रस्ता अपूर्णच आहे आदी गावांनसह अनेक खेड्यांना आजही रस्ते नाहीत. भेंडाळा, जांब समर्थ ,घाणेगाव येथील शेतकर्यांच्या व केळी ,डाळींब, पपई च्या बागांचे 2017 मध्ये वादळी वार्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले होते सलग दोन वर्षे प्रचंड नुकसान शेतकर्यांचे झाले होते याची पाहणी व पंचनामा स्वतः पालक मंत्री व तत्कालीन आमदार यांनी ही पाहनी करून नुकसानभरपाईची मागणी तात्काळ महसुली मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सांगून मिळवून देण्यात येईल असे आश्वासन शेतकर्याला दिले होते. त्यांचा निधीही घनसावंगी तालुक्याला आला होता. परंतु आजही त्या नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. म्हणून शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर निघत असून शेतकर्यांनी दोन्ही पालकमंत्र्यांनी आजी,माजी खोटे आश्वासन दिले असल्याचे म्हटले आहे.
Leave a comment