माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन
जालन्यात युवामोर्चातर्ङ्गे आयोजित शिबिरात 91 रक्तदात्यांनी केले रक्तदान
जालना । वार्ताहर
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान याला दुसरा कोणताही पर्याय अद्यापपर्यंत तरी उपलब्ध नाही कोरोना प्रादुर्भाव काळात रक्ताचा तुटवडा भासल्यास कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी भाजपा युवा मोर्चा तत्पर असून भाजपा युवा मोर्चा तर्ङ्गे आयोजित रक्तदान शिबिरे ही राष्ट्रभक्तीचे मूर्तीमंत उदाहरणे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी केले जालना शहरात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी मंत्री *आमदार बबनराव लोणीकर* यांच्या शुभहस्ते ङ्गीत कापून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
या शिबिरात 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले उदघाटन प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब कदम जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे शहराध्यक्ष राजेशजी राऊत, सिद्धीविनायक मुळे, भाजपा जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाश टकले यांची प्रमुख उपस्थिती होती कोरोना प्रादुर्भावाचा काळात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन सुरू केले असून युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुलभैया लोणीकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण मराठवाड्यात 119 मंडलामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रभरात कुठेही रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी युवा मोर्चा तर्ङ्गे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत भाजपा युवा मोर्चा वतीने, भाजपा कार्यालय संभाजी नगर, जालना येथे आज भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कोरोना संकटात समाजभान म्हणून मदत व केंद्र सरकारची वर्षपूर्ती या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ह.भ.प. रमेश महाराज वाघ, महिला आघाडीचे जिजाबाई जाधव, कमलताई तुल्ले, सक्ेहा जोशी, ममताताई सुर्यवंशी, स्वीटी दायमा, व बाबासाहेब कोलते, नारायण पवार, पंकज कुलकर्णी, मधु दंङारे, अमोलजी खडके असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा रक्तदान शिबिर जिल्हा संयोजक प्रा.सुजितकुमार जोगस, संजय गांधी निराधार योजनेचे जालना तालुकाध्यक्ष प्रा.सहदेव मोरे पाटील, सुशील ढोले, सागर आर्य, सचिन गाडे, विनोद दळवी, गुलाब खारवने, विशाल शिराळे, नारायण मगर विलास भुतेकर गणेश खरात यांनी विशेष प्रयत्न केले.
Leave a comment