परतूर । वार्ताहर

गेल्या तीन महिन्यापासून देशासह संपूर्ण जग कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. अनेक उद्योग,व्यवसाय ठप्प झाले आहेत. तीन महिन्यासून संसर्गाचा आकडा सातत्याने वाढतच आहे. कोरोनाची ही साखळी तोडायची असेल तर आरोग्य विभागाने जारी केलेल्या दिशा नियमांचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. वारंवार हात धुणे, घराबाहेर असतांना सतत तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे जाणीवपूर्वक टाळणे, सामाजिक अंतराचे भान ठेवणे आदी नियमांचे पालन हाच कोरोनापासून बचावाचा आणि कोरोनाला हरविण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. परतूर शहरात लायन्स क्लबच्या सुरु करण्यात आलेल्या कोरोना जनजागृती व समुपदेशन कक्षाला त्यांनी लोणीकर यांनी गुरुवारी भेट दिली.

यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, नगराध्यक्षा विमल जेथलिया, लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, अध्यक्ष डॉ दत्तात्रय नंद, रामेश्‍वर नळगे. सरपंच संपत टकले, प्रकल्प संचालक डॉ. सुनिता खालापुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात लोकांच्या मदतीच्या धावून जात लायन्स क्लबने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमातून अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला. तालुका स्तरावर सुरु करण्यात आलेल्या समुपदेशन कक्षाचा शहर तसेच ग्रामीण भागातील जनतेला ङ्गायदा होणार असल्याचे मत माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी यावेळी व्यक्त केले.   सामाजिक अंतराचे निकष लक्षात घेऊन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.  यावेळी संदीप जगताप, राजेश काकडे, पल्लवी वाघमारे, संजीवनी खालापुरे,सुखराज कोटेचा, ओंकार कदम, संदीप दाभाडे आदींची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.