बदनापूर । वार्ताहर

शहरातील औरंगाबाद-जालना महामार्ग वर असलेल्या एका नवीन तयार होत असलेल्या दुकानाला रात्री अज्ञात व्यक्तींनी शटर वाकवून आत प्रवेश करीत आग लावल्याने या आगीत दुकानांतील ङ्गर्निचर व इलेक्टिक ङ्गिटिंग व काच जाळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. बदनापूर शहरातील औरंगाबाद जालना महामार्ग रस्त्यावर एका तरुणाने व्यवसाय उभारावा या हेतूने मागील एक वर्षांपासून या तरुणाने तीन मजली इमारत बांधून सर्व आधुनिक तर्हेने ङ्गर्निचर, काचा वगैरे लावून कापड दुकान उभारले होते. सर्व काम होऊन ङ्गक्त माल आणणे बाकी असताना लॉकडाऊनमुळे माल भरणा केलेला नव्हता. 

या दुकानात मोठ्या प्रमाणात ङ्गर्निचरचे काम झालेले होते तर महागडे काच दुकानात लावण्यात आलेले होते. दरम्यान 16 जून च्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी खालच्या मजल्याच्या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला व नासधूस करत आग लावली या आगीत दुकानातील ङ्गर्निचर, इलेक्ट्रिकल ङ्गिटिंगसह  सर्व काचा जाळून खाक झाल्या, सदर प्रकार 17 जून रोजी सकाळी उघडकीस आला असता दुकानदार रवी नाईकवाडे यांनी पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर यांना माहिती देताच स्वतः एम.बी.खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, चरणसिंग बमनावत यांनी भेट देऊन पाहणी केली व घटनास्थळ पंचनामा केला  या आगीत प्रचंड नुकसान झाले असून महामार्ग रस्त्यावर सदर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नवीन वयवसाय करणार्‍या दुकानमालकाचे नुकसान करण्यात आल्याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.