कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या सर्वच गावांच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे तालुक्यातील गोदाकाठचे शेवटच्या टोकाचे गाव भादली या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या वर्षी पांदण रस्त्याची स्वरूप आले आहे. गुडघ्याइतके रोडवर खड्डे झाले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने प्रवास करणे कठीण झाले आहे कुंभार पिंपळगाव बाजारपेठेत खरिपाच्या पेरणीसाठी शेती उपयोगी साहित्य व दवाखान्यात येण्यासाठी मोठे जिकरीचे झाले आहे .वयोवृध्द रूग्णांचे हाल होत आहेत.
गेल्या दोन चार वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता जैसे थेच आहे वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगण्यात येते त्यामुळे रस्ता दुरुस्त कोण करणार असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे . रस्त्यावर खड्डे वाढल्याने अपघाताचे घटना घडत आहेत रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अधिकार्यांसह लोकप्रतिनिधीचे ही याकडे दुर्लक्ष होत आहे गतवर्षी झालेल्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे मागील वर्षी डांबरी रस्ता पूर्ण ङ्गुटल्याने ऊस वाहतुकीसाठी डांबरी रस्त्यावर मुरूम- माती टाकण्यात आली होती पाणी वाहून जात नसल्याने खड्डे तयार झाले खड्ड्याचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनही रस्ता झाला नाही सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद विभाग यांच्या घोळात ग्रामस्थांचे रस्त्यामुळे हाल होत आहेत रस्त्यामुळे गावाचा संपर्क तुटला एखादा प्रसंग उद्भवल्यास ग्रामस्थांचे हाल होऊ शकतात.बाहेर पडणे मुस्शीकिल होईल, आतातरी रस्ता करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
Leave a comment