शिलाताई जैस्वाल यांचे कार्य उर्जा देणारे-संतोष मोहिते
जालना । वार्ताहर
कोरोना संसर्गजन्य काळात गाव पातळीवर कार्य करणार्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,पोलीस, ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, या सर्व कोरोना योध्द्यांना पावसाळ्यात संरक्षण व्हावे तसेच प्रोत्साहन देण्यासाठी समाजसेविका श्रीमती शिलाताई जैस्वाल यांनी स्वखर्चाने छञी वाटप करून त्यांचा सत्कार केला. तथापि ग्रामीण भागात काम करणार्या लढवय्या योध्द्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना नवीन उर्जा मिळावी यासाठी शिलाताई जैस्वाल यांचे कार्य बळ देणारे आहे असे पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख संतोष राव मोहिते यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
ग्रामपंचायत कार्यालय परिसरात बुधवारी ता. 17 सुरक्षित अंतराचे पालन करून झालेल्या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सुधीर पाखरे, पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख संतोषराव मोहिते, उपसरपंच बाबूराव गोल्डे, आण्णा गोल्डे, रविकांत पाखरे, रामेश्वर कदम, शिवप्रसाद कंजे, राम शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संतोषराव मोहिते यांनी उपक्रमाचे स्वागत करून गावास कोरोना मुक्त ठेवण्यात कर्मचारी वर्गाने केलेली जनजागृती, घेतलेल्या अथक परिश्रमाने कोरोना पासून गाव सुरक्षित राहिले . त्यांना प्रोत्साहन देण्याच्या कार्यामुळे नवी उर्जा मिळेल. असे संतोष राव मोहिते यांनी सांगितले. आयोजक तथा समाजसेविका शिलाताई जैस्वाल यांनी कोरोना योध्द्यांना पावसाळ्यात संरक्षण मिळावे आणि काम करण्यास अधिक बळ प्राप्त व्हावे,या उद्देशाने सामाजिक दायित्वाने बेथल व रेवगाव येथे आभार उपक्रम राबविले असे नमूद केले. या वेळी रेवगाव तसेच बेथल येथील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस, यांना छञी वाटप व पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मायकल पाखरे,गुंङ्गाबाई जैस्वाल, योसेङ्ग पाखरे, सुभाष पाखरे, गणेश पाखरे, गीता कोल्हे, सविता तारू, सुभद्रा शेळके, नंदाबाई पाखरे, पुंजाराम मुळक ,ग्रंथपाल काशीनाथ गायकवाड, यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Leave a comment