जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांचे आवाहन
जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास 300 एवढी झाली असुन बाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही अतिशय गंभीर व चिंतेची बाब असुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले आहे.
जालन्यामध्ये आजघडीला दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेक दुकानदार सामाजिक अंतराचे तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक अंतराचे, प्रशासनाच्या सुचनांचे पालन न करणार्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच दुकान सील करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगत जालना शहरामध्ये काही ठिकाणी दुकानदारांवर कारवाई करुन त्यांची दुकाने सील करण्यात आले असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिली.
Leave a comment