बदनापूर । वार्ताहर

बँक ऑफ महाराष्ट्रच्या बदनापूर येथील शाखेत नुकत्याच झालेल्या पावसाने छत गळून येथे मोठया प्रमाणात पाणी साचत आहे त्याचप्रमाणे येथील विज पुरवठा सुरळीत रहावा म्हणून देण्यात आलेल्या युपीएसही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे.  छतातून पाणी टपकत असल्यामुळे व तांत्रिक अडचणीमुळे या शाखेत मागील चार ते पाच दिवसांपासून काम बंद आहे त्यामुळे पीक कर्ज घेण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र असून शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखली जाणारी ही शाखा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकर्‍यांनाच त्रासदायक ठरत आहे.

बदनापूर शहरात पहिली राष्ट्रीयकृत बँक म्हणून बॅक ऑफ महाराष्ट्रच्या बदनापूर शाखेकडे पाहिले जाते. मोठया संख्येने आजूबाजूच्या गावकर्‍यांचे विविध बॅक खाते तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांचे वेतन खातेही या बँकेत आहेत. या बँकेमार्फत शेतकर्‍यांना मोठया प्रमाणात पीक कर्जही वाटप करण्यात येते. यंदाही कोरोना मुळे सुरू असलेल्या सोशल डिस्टेन्सींगमुळे शेतकर्‍यांना त्रास होऊ नये म्हणून या शाखेचे शाखा व्यवस्थापक चेतन वानखेडे, रमेश पुरोहित, गोविंद लखमले, राहुल शेळके, सचिन सिरसाट, आदींनी पुढाकार घेऊन शाखेत गर्दी होऊ नये या उददेशाने प्रत्यक्ष गावात जाऊन शिबिर घेऊन त्या त्या गावातील शेतकर्‍यांचे पीक कर्ज नुतनीकरण व नवीन कर्जासाठीचे अर्ज भरून घेतले. मात्र मागील आठवडयात झालेल्या पावसामुळे या शाखेचे छत गळायला लागले. छतातून सारखे पाणी टपकत असून त्यामुळे या ठिकाणी विजेचा योग्य पुरवठा व्हावा म्हणून ठेवण्यात आलेल्या युपीएस बँटर्‍याही बंद पडल्या या तांत्रिक अडचणीमुळे  संगणक चालू नसल्यामुळे बँकेचे कामकाज मागील आठवडयापासून सलग चार ते पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे कामकाजच ठप्प पडून आहे सध्या पीक कर्जाची शेतकर्‍यांना अतिशय निकड असताना व शाखेतील अधिकारी- कर्मचार्‍यांनीही गावात जाऊन कागदपत्रे जमा करून आणलेली असतानाही गळणार्‍या छतामुळे व तांत्रिक अडचणीमुळे संगणक सुरूच करता येत नसल्याने बँक पीक र्कर्ज शेतक्र्‍यांना वाटप करू शकत नाही. या बाबत येथील शेतकरी व ग्राहकांनी वेळोवेळी या बाबत बँक प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्याच प्रमाणे काही ग्राहकांनी मागील एक वर्षांपासून बँक व्यवस्थापनाच्या कानावर या शाखेतील तांत्रिक  अडचणी सांगून उपाययोजना करण्याचे सुचित केलेले असतानाही बँक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या शाखेतील कामकाज ठप्प होत आहे. या पूर्वीही मागील वर्षी या शाखेत पाणी साचून कामकाज ठप्प् पडलेले होते. असे असतानाही बँक प्रशासन का दुर्लक्ष करत आहेत या बाबत शेतकर्‍यांमध्ये उलट सुलट चर्चा आहे. ही शाखा जुनी असल्यामुळे तालुक्यातील प्रमुख सरकारी, निमसरकारी कार्यालयाचे वेतन खाते तसेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांचे पीक कर्ज खाते याच शाखेत असतानाही या शाखेकडे महारार्ष्ट बँक प्रशासन का दुर्लक्ष करत आहेत या बाबत शंका उत्पन्न केल्या जात आहे. या बाबत येथील प्रगत शेतकरी संतोष पवार यांनी सांगितले की, ही शाखा जुनी असून अनेक शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. यंदाही पाऊस सुरू होण्यापूर्वीच या शाखेतील अधिकारी कर्मचार्‍यांनी पीक कर्जासाठी शेतकर्‍यांची  गर्दी होऊ नये म्हणून गावा- गावात शिबिरे आयोजित करून कागदपत्रे व अर्ज भरणा करून घेतलेली आहे असे असताना व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे तांत्रिक अडचणींची पूर्तता न झाल्यामुळे या बँकेचे कामकाज मागील आठवडयापासून बंद आहे. यामुळे ऐन हंगामात पेरणीसाठी गरज असताना शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांची हिरमोड होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.