अडीच लाखाचा ऐवज लंपास
जालना । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये चोरट्यांंनी चोरी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी नवीन जालना भागात एकाच दिवशी तीन दुकाने फोडून चोरंटयानी पोलीसांसमोर आव्हान ऊभे केले. असाच प्रकार काल जुना जालना भागात चोरटयांनी ग्राहक सेवा केंद्र मिनी बँक फोडली आहे.
शहरातील माळीपुरा येथील रजा काम्प्यूटर ग्राहक सेवा केंद्र हे रोज प्रमाणे दुकानाचे मालक गुलाम मेहबूब यांनी आपली दुकान संध्याकाळी 6 च्या दरम्यान बंद केली होती. नित्य नियमाप्रमाणे आज सकाळी 10 वाजता दुकान उघडण्यास दुकानातील कर्मचारी आले असता, त्याना दुकानातील शटरच्या कुलूपाची पटटया तोडल्याला दिसून आली हि चोरीची बाब लक्षात येता त्यांनी दुकान मालक गुलाम मेहबुब यांना कळवले. दुकानात आल्यानतर दुकान उघडून पाहिले असता या ग्राहक सेवा केंद्रातन 3 कॅम्प्यूटर, लॅपटाप, नोटा मोजण्याची मशिन, तसेय रोकरक्कम 95 हजार असा एकूण अंदाजे दोन ते अडीच लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केले आहे. अशी फिर्याद दुकान मालक गुलाम महबूब यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेली आहे. वृत्त संकलन होई पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a comment