तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कृषी सेवा केंद्रात जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या धडक तपासणी मोहीम सात कृषी सेवा केंद्र चालकांना नोटिसा बजावल्या असताना जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी कदम यांच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी धाडशी कारवाई करीत असताना कदम यांचे मात्र याकडे मुद्दामून दुर्लक्ष करीत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांनी दखल घेवून कारवाई करावी अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
तीर्थपुरी येथील 20 ते 25 कृषी सेवा केंद्र असून या कृषी चालकाकडून त्याची अडवणूक बी बियाणे खते औषधी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद घनसावंगी पंचायत समिती येथे कृषी विस्तार अधिकारी कदम यांची नियुक्ती केली असताना त्यांची मात्र या कृषी सेवा केंद्र चालकावर काहीच नियंत्रण नसल्यामुळे व कदम महाशय तीर्थपुरीत येतात यानंतर एखाद्या कृषी सेवा केंद्रावर बसून सर्व कृषी चालकाची गळाभेट खिसा भेट केली जाते एकाही दुकानांची तपासणी न करता कागदोपत्री तपासणी केली जाते यामुळे कृषी सेवा केंद्र चालकाची मनमानी वाढली असून शासनाने शेतकर्यासाठी युरिया व नामांकित खत शेतकर्यांना मिळावे या हेतूने डीलर मार्फत खते सर्व कृषी सेवा केंद्रांना दिले जातात पण काही कृषी सेवा केंद्र चालक युरिया खत आले लिंकिंग करून शेतकर्यांची अडवणूक व पिळवणूक करीत आहे यावर दैनिक लोकप्रश्न दि.26 रोजी बातमी झळकताच जालना कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे व नियंत्रण तज्ञ गराडे यांनी तीर्थपुरी तात्काळ येऊन सात कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता त्यांच्या हाती वेगळेच चित्र कृषी सेवा केंद्र चालक च्या दुकानात व खताच्या गोदाम मध्ये हाती लागले एक तर काही कृषी सेवा केंद्राच्या गोदाम मध्ये बिगर नोंदणी विनापरवाना खते दिसून आली ही खते गोरगरीब शेतकर्यांच्या माथी मारून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक असल्याची बाळासाहेब शिंदे यांच्या लक्षात येताच यांनी धाडसी पाऊल उचलून सात कृषी सेवा केंद्रांना शासनाच्या नियमाची उल्लंघन केल्यामुळे त्यांना नोटिसा बजावल्या एक तर पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी कदम यांना यांच्या कार्यक्षेत्रात कृषी चालकाचा हा सावळा गोंधळ माहित आहे का नाही पण त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी सर्व दुकानाच्या तपासण्या का केल्या नाही म्हणावे तर हा नोंदणी बोगस खते तीर्थपुरी काही चालकाकडे आली कशी हा प्रश्न सर्वसामान्य शेतकर्यांमधून केला जात आहे यामुळे कदम आणि कृषी चालक यांची मैत्री अनेक दिवसापासून असावी यामुळे हा सर्व प्रकार विस्तार अधिकार्यांना माहित आहे एकतर शेतकरी मेटाकुटीला आलेला असून अनेक वर्षानंतर मृग नक्षत्रात पाऊस पडला आणि शेतकर्यांना खरिपाची पेरणी वेळेवर करण्याची संधी यामुळे बळीराजा आनंदित असताना पेरणीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर खते आणण्यासाठी जातात तिथे मात्र युरिया खत आले लिंकिंग दुसरी जोड घेतल्याशिवाय युरिया खत दिली जात नाही ही अशी अट कृषी सेवा केंद्रातून केल्यामुळे आणि गोरगरीब शेतकरी मात्र न युरिया खत न भेटल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले.
या आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यावर ही वेळ येते हे दुर्भाग्य म्हणावे तसेच पालकमंत्री आमदार राजेश टोपे यांच्या मतदारसंघात हा शेतकर्यांना पिळवणुक होत आहे यामुळे तसेच हा सर्व प्रकार अनेक वर्षापासून पंचायत समितीत कार्यरत असलेले विस्तार कदम यांची चौकशी करावी तसेच काही कृषी सेवा केंद्रात अजूनही हा प्रकार लिंकचा सुरूच असून उर्वरित तपासली न केलेल्या दुकानाची अधीक्षक शिंदे यांनी अचानक तपासणी करून या दुकानाच्या झाडा-झडती करण्याची गरज अनेक शेतकर्यांमधून केली जात असून खताची टंचाई होत असताना विस्तार अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा मॅडम यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
Leave a comment