कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
या नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाज बाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रकानुसार गुरुजनांना सूचना देण्यात आल्या असून ता. 15 जून सोमवार पासून शैक्षनिक नवीन वर्षाच्या शाळा सुरू झाल्या मात्र या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरू होणार या शाळेला विद्यार्थी नसल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजलीच नाही.
शाळेत फक्त शिक्षकांची उपस्थिती होती सर्वत्र शाळेत शुकशुकाट दिसून येत होता बालकांचा किलबिलाट मात्र ऐकायला येत नसल्याने शिक्षकांनाही काहीतरी विसरल्यासारखं वाटत असल्याचे शिक्षकांनी म्हंटले आहे. कोरोणाच्या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा शिक्षण विभागिने अवलंब केला आहे. कोरोनाचे निर्बंध टप्प्याने टप्प्याने कमी झाल्यावर त्यानुसार शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या आदेशाचे पालन करत मिळालेल्या निर्णयाची आमल बजावली काटेकोर पुणे करण्यात येईल असे शिक्षकांनी म्हणटले आहे. घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षक देण्यात सुरुवात करण्यात आली असून आज शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठ ज्या पालकांकडे अॅनराईड मोबाईल आहेत त्या पालकांचा मोबाईल नंबर घेऊन वर्गानुसार ग्रुप तयार करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अॅनराईड मोबाईल नाही त्यामुळे गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे मिळेल हा ही प्रश्न पालकांनामध्ये होत आहे.
Leave a comment