जालना । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील अनेक पांदन व शेती शिव रस्त्यांची प्रश्न प्रलंबित आहेत रस्त्यामुळे शेतकर्यांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे .अनेक वेळा रस्त्यामुळे शेतीमाल बाहेर काढणे जिकिरीचे होते. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होते. शासनाचे शेतीसाठी रस्ता तात्काळ करून देण्याचे आदेश असूनही अनेक रस्त्यांची प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबितच आहेत.आनेक वेळा रस्त्याच्या प्रश्नामुळे
वादाचे विषय होऊन चित्तथरारक घटनाही घडतात . मौजे राजाटाकळी शिवारातील गट नंबर ( 60 ) माझ्या मालकीच्या शेतात जाण्यास रस्ता करून देण्यात यावा वेळो वेळी अशी मागणी येथील श्रीमती सत्यभामा असाराम सुराशे या महिलेने केली होती तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी वेळीच दखल घेऊन 18 जानेवारी 2020 ला तात्काळ स्थळ पाहणी करून आजु बाजूच्या सर्व शेतकर्यांना बोलून तलाठी ,मंडळ अधिकारी सह पंचा समक्ष महसूल पथकाने पंचनामा करून पुढील कारवाईसाठी आदेश देण्यात आले होते. त्यासाठी रस्त्याच्या खुणा करणे बाकी आहे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची बदली झाली व पुढील रस्त्याची कारवाई थांबली आहे .या पुढे नवीन आलेले तहसीलदार साहेबांनी लक्ष घालून रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी महिला शेतकर्यांनी केली आहे स्थळ पाहणी करून. 6 सहा महिने झाले तरी रस्त्याचा प्रश्न प्रलंबितच आहे याबाबत पुन्हा तहसील कार्यालयास 9/5/20 ला अर्ज देण्यात आला आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून खरीप पेरणीची लगबग सुरू असून शेतात बैलगाडी जाण्यास शेती अवजारे नेण्यास बियाणे खत घेऊन जाण्यात अडचण येत आहे व पुढे शेतात पिकलेला माल बाहेर काढणे कठीण होते . या रस्त्याकडे तहसील प्रशासनाने लक्ष घालून रस्त्याचे काम तात्काळ करून देण्यात यावे अशी मागणी या महिला शेतकर्यांकडून होत आहे.
सध्या खरिपाची पेरनी सुरू आहे
शेतात जाण्या -येण्यासाठी रस्त्यांची मागणी वेळो वेळी केली आहे.सहा महिण्या पुर्वी तत्कालीन तहसिलदार यांनी स्थळ पाहणी करून पंचनामाकरून पुढील कारवाईचे आदेश हि देण्यात आले होते.मात्र आद्याप रस्ता झाला नाही.सध्या शेतात जाण्यासाठी आडचन येत आहे.शेतासाठी पावसाळ्यात पुर्वी रस्ता करून देण्यात यावा.
श्रीमती सत्यभामा आसाराम सुरासे,शेतकरी
Leave a comment