शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू; खाजगी दवाखाना केला सील
भोकरदन । वार्ताहर
भोकरदन शहरातील जामा मजीत जवळिल कुरेशी मोहल्ला येथे एका साठ वर्षीय व्यक्ती चा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने भोकरदन शहरात घबराटीचे वातावरण पसरले असून या रुग्णाच्या घराला व परिसराला तहसीलदार संतोष गोरड गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत वैद्यकीय अधीक्षक मोतीपवळे नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अमित्कुमार सोंडगे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आदी अधिकार्यांनी कर्मचार्यांसह भेट देऊन 68 घरांचा हा कुरेशी मोहल्ला चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला तर या रुग्णाच्या घरातील चार व्यक्तींना भोकरदन शहरातील कोविंड केअर सेंटर येथे ठेवून त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले तर या रुग्णाला दाखविण्यात आलेले भोकरदन शहरातील खाजगी दवाखाना सील करण्यात आला असून सदरील डॉक्टरला कोरा टाईन करण्यात आले आहे दरम्यान व्यापारी महासंघाने रविवार दिनांक 14 पंधरा-सोळा जून असे सलग तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले आहे.
सदरील रुग्ण हा जाफराबाद येथून आल्यापासून गेले पाच-सहा दिवस घरीच आजारी होता म्हणून त्याला दोन दिवसापूर्वी सिल्लोड येथे औषध उपचार करण्यासाठी नेले असता तेथून त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात म्हणजे घाटी मध्ये पाठवले याठिकाणी त्याचे लाळेचे नमुने घेतले असता सदरील रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पेशंट भोकरदन येथे रहात असलेला कॉल कुरेशी मोहल्ला परिसर सील करण्यात आला असून भोकरदन शहरात जास्त गर्दी होऊ नये म्हणून व्यापारी महासंघाने व्यापार्यांची बैठक घेऊन दिनांक 14 15 16 जून असे तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतरांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आता पुढील तीन दिवस भोकरदन शहरात जनता कर्फ्यू लागू असणार आहे.
Leave a comment