जालना । वार्ताहर
स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचच्या वतीने आ.कैलास गोरंट्याल व जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. संगीताताई गोरंट्याल यांची भेट घेऊन विद्युतदाहिनी उभारण्याबाबत याविषयी चर्चा केली. यावेळी गोरंट्याल साहेब म्हंटले कि याविषयी जिल्हाधिकारीसाहेबांसोबत चर्चा झाली असून यासाठी निधी देखील मंजूर झाला आहे. लवकरच जालन्यात विद्युतदाहिनी उभारण्यात येईल अशी त्यांनी ग्वाही दिली. आज जे निवेदन दिले त्यात असं म्हंटल आहे कि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास त्यावर अंत्यसंस्कारानंतरही चिंता कायम असते. परिणामी जालना नगरपालिकेने रामतीर्थ अथवा अमरधाम हिंदू स्मशानभूमीत विद्युतदाहिनी उभारावी. विद्युतदाहिनी उभारल्यास प्रदूषणाच्या समस्येबाबतच लाकडासह इतर जळतण साहित्याचा खर्च देखील कमी होईल.
कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे तसेच बरेच लोक असे देखील आहेत त्यांना अंत्यसंस्काराचा खर्च करणे देखील शक्य होत नाही. पावसाळ्यात अनेकदा जळतण साहित्य देखील मिळत नाही, लाकडं सुद्धा ओली असल्याने अंत्यसंस्कार करतांना बर्याच अडचणी येतात. कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास विद्युतदाहिनीमुळे अंत्यसंस्कार करणे सुलभ होईल. कोरोनाबाधित मृतदेहास नगरपालिकेचे कर्मचारी अंत्यसंस्कार करतांना मोठी भीती असते. विद्युतदाहिनीमुळे भीतीचे प्रमाण देखील नक्कीच कमी होईल. जालना नगरपालिकेने भविष्यातील विचार लक्षात घेऊन लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घेऊन जालना शहरात विद्युतदाहिनी उभारावी अशी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली त्यावेळी. गजेंद्र देशमुख, अमित कुलकर्णी, आनंद नेब, सुमित कुलकर्णी, अमोल देशमुख आदींची उपस्थिती होती तर निवेदनावर वैभव जोशी, गणेश लोखंडे, विलास कुलकर्णी, कृष्णा दंडे, संकेत मोहिदे प्रथमेश कुंटे, शुभम कौडगावकर, शंभू मांडे, धनंजय डिक्कर, अक्षय जैन, कुणाल तांबट, अमर पवार आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment